अमरावती: महाबीजचे सोयाबीन बियाणे घटले; यंदा 8 हजार क्विंटलच बियाण्यांचा पुरवठा
Soyabean Saam Tv

अमरावती: महाबीजचे सोयाबीन बियाणे घटले; यंदा 8 हजार क्विंटलच बियाण्यांचा पुरवठा

आता शेतकऱ्यांची मदार खाजगी बियाण्यांवर

अमर घटारे

अमरावती: गेल्या कित्येक वर्षा पासून शेतकऱ्याच विश्वासाच बियाणं म्हणून महाबीजच्या बियाण्याची ओळख आहे. त्यामुळे महाबीज अमरावती जिल्ह्यात दरवर्षी 50 हजार क्विंटलच्या वर सोयाबीनच्या बियाण्याची विक्री करते. मात्र, या वर्षी जिल्ह्यात महाबीजकडून सोयाबीनचे केवळ 7 ते 8 हजार क्विंटल बियाणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना आता खाजगी बियाण्यावर अवलंबू राहावं लागणार आहे.

महाबीजने टाकलेल्या सीड प्लांटवरच हे बियाणे उगवले नसल्याने बियाण्यांची टंचाई निर्माण झाल्याची माहिती खुद्द महाबीज चे जिल्हा व्यवस्थापक संजय देशमुख यांनी दिली.

Soyabean
"मी बांधील असेन तो फक्त जनतेशी"; शिवबंधन नाकारल्यानंतर संभाजीराजेंचं सूचक ट्वीट

अमरावती जिल्ह्यात 2 लाख 65 हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. मागील वर्षी अवकाळी पावसामुळे महाबीज बियाण्याचे क्षेत्र खराब झाल्याने बियाणे उपलब्ध झाले नाही, असे महाबीज जिल्हा व्यवस्थापक संजय देशमुख यांनी सांगितले.

खाजगी बियाण्याच्या कंपन्यांकडून वारंवार शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या घटना बऱ्याच वेळा समोर आलेले आहे. त्यामुळे कित्येक वर्षापासून शासनाच्या देखरेखीखाली असलेल्या महाबीजच्या बियाण्यावर शेतकऱ्यांचा विश्वास मोठा आहे. मात्र यावर्षी बाजारात महाबीजचे बियाणे बाजारात उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आता खासगी कंपन्यांच्या बियाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे खाजगी कंपन्या बियाण्यांचे दर वाढणार का अशी भीती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे महाबीजने आणि इतर खाजगी कंपन्यांसोबत साटंलोटं तर नसेल ना अशी शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हे देखील पाहा-

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महाबीज चे बियाणे हे कृषी केंद्रांमध्ये विक्रीसाठी केवळ 15 टक्के पर्यंत आलेले आहे महाबीज बियाणे हे महाराष्ट्र सरकार उत्पादित करत असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास आहे. मात्र बियाणे बाजारात कमी उपलब्ध असल्यामुळे याचा फायदा खासगी बियाणे कंपन्यांना होणार असल्याचे व्यंकटेश कृषी केंद्राचे संचालक दिनेश गुप्ता यांनी व्यक्त केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com