अज्ञाताने दीड एकरातील कलिंगड कोयत्याने कापले; बळीराजा ढसाढसा रडला

Junnar News: दत्तात्रय काकडे या शेतकऱ्याच्या तब्बल दीड एकर कलिंगडाच्या शेतीचे अज्ञात व्यक्तीने नुकसान केले आहे.
Junnar Agriculture News:
Junnar Agriculture News:Saam TV

जुन्नर : रात्रंदिवस काबाड कष्ट करुन जोमात आलेलं शेतातील उभं पीक, हे शेतकऱ्यासाठी किती महत्वाचं असतं हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. मग त्याचा मोबदला मिळण्याअगोदरच कुणी त्यावर हात साफ केला, तर त्याचा शेतकऱ्याच्या मनावर काय परिणाम होत असेल, ही व्यथा त्या शेतकऱ्यालाच ठाऊक. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीत अशीच एक घटना घडली आहे. दत्तात्रय काकडे या शेतकऱ्याच्या तब्बल दीड एकर कलिंगडाच्या शेतीचे अज्ञात व्यक्तीने नुकसान केले आहे.

Junnar Agriculture News:
वीजबिल थकबाकी; पालिकेच्या सहा बोअरवेलचे कनेक्शन कट

सध्याच्या उन्हाच्या कडाक्यात कलिंगडाला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी आनंदात आहे. अशातच दीड एकर शेतातील तोडणीला आलेल्या कलिंगडच्या पीकाचं अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा करत नुकसान केलं. या अज्ञात व्यक्तीने शेतातील कलिंगडे कोयत्याने तर फोडलीच, शिवाय कलिंगडाचे वेलही कापून टाकले. त्यामुळे ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने दत्तात्रय काकडे यांना अश्रू अनावर झाले.

कलिंगडाला चांगला बाजारभाव मिळुन दोन पैसे हातात येतील, या आशेने पिंपळवंडीतील काकडे कुटुंब दिवसरात्र एक करुन कलिंगडाचे संगोपन करत होते. त्यांच्या कष्टाला यशही मिळालं होतं. पण, कलिंगड तोडणीला १५ दिवसाचा कालावधी असताना बुधवारी रात्री अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा करत संपूर्ण कलिंगड शेतीचे नुकसान केलं. दरम्यान, हा खोडसाळपणा नेमका कुणी व कशासाठी केला हे अद्यापही समजू शकलं नाही. मात्र या खोडसाळपणाने दत्तात्रय काकडे यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com