नांदेडला केळी उत्पादक समुह मंजूर करा; एफपीओसह स्वाभिमानीची मागणी

मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात केळीची लागवड केली जाते. जिल्ह्यातील गोदावरी नदीचे सुपीक खोरे आणि नांदेड, अर्धापूर आणि मुदखेड तालुका या भागात मोठ्या प्रमाणात केळी या पिकाची लागवड केली जाते.
नांदेडला केळी उत्पादक समुह मंजूर करा; एफपीओसह स्वाभिमानीची मागणी
जिल्हा कृषी अधीक्षक चलवदे यांना निवेदन देताना

नांदेड : मराठवाड्यात सर्वाधीक केळी लागवड होणार्‍या नांदेड जिल्ह्यात केळी उत्पादक समुह (बनाना क्लस्टर) मंजूर करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्याकडे केली आहे.

मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात केळीची लागवड केली जाते. जिल्ह्यातील गोदावरी नदीचे सुपीक खोरे आणि नांदेड, अर्धापूर आणि मुदखेड तालुका या भागात मोठ्या प्रमाणात केळी या पिकाची लागवड केली जाते. ईसापूर धरण, येलदरी धरण आणि जायकवाडी धरण आणि या व्यतिरिक्त शेकडो बंधारे यामुळे या केळी उत्पादन क्षेत्रात शेतीसाठी पाण्याचा बारमाही मुबलक पुरवठा आहे. नांदेड जिल्हा हा निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी मराठवाड्यात प्रसिद्ध आहे.

हेही वाचा - Good News : आर्यन देशमुख चिकाळेकर भारतीय युद्ध नौकेत लेफ्टनंटपदी

जुन्या काळी अर्धापुरी केळी महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशात प्रसिध्द होती. मागील ३०- ३५ वर्षापासुन नांदेड जिल्ह्यात केळी मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, नांदेड आणि मुदखेड तालुक्यासोबतच शेजारील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. या सर्व भागातील केळीची व्यापारपेठ म्हणून जिल्ह्यातील अर्धापूर प्रसिद्ध आहे.

केंद्र सरकारच्या कृषी विषयक धोरणानुसार २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पादन दुप्पटीने वाढावे यासाठी शासकीय स्तरावरतून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत आणि त्यादृष्टीने नाशवंत शेतमालाची साठवण आणि विपणन यावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आवश्यक आहे. केळी उत्पादक समुह महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, अपेडामार्फत स्थापना करण्यात आल्यास साठवण आणि विपणन या क्षेत्रात गुंतवणूक होऊन उच्चदर्जा असलेल्या केळीची नांदेड येथून निर्यात सुरु करता येईल. परिणामी नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍यासोबतच हिंगोली व परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अधीक दर मिळतील. यासोबतच ग्रामीण भागात नवीन रोजगार निर्मिती होवून केळी प्रक्रिया उद्योगाला सुद्धा चालना मिळू शकेल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, नंदीग्राम शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक संदीप डाकुलगे, संतोष दंडे उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com