पारंपरिक शेतीला फाटा देत मावळ मध्ये फुलतीये सोनचाफयाची शेती... 

सोनचाफा ही बाग म्हणून फुलविणारे अरुण काशीद हे मावळ तालुक्यात वेगळेच शेतकरी ठरले आहेत.
Maval News
Maval NewsSaam Tv

मावळ - सोनचाफा नुसतं असं म्हणल तरी प्रेमाच्या संवेदना उमटल्याशिवाय राहत नाही. ज्याला त्या उमटणार नाही तो माणूसच नसेल. याच भावनेने मावळातील इंदोरी गावा मधील प्रगतशील शेतकरी अरुण काशीद यांनी भंडारा डोंगराच्या पायथ्याशी सोनचाफ्यांची बाग फुलवली आहे. ही बाग नुसतीच फुलवली नाही तर त्यातून भरघोस उत्पन्नही मिळवीत आहेत. सोनचाफा ही बाग म्हणून फुलविणारे अरुण काशीद हे मावळ तालुक्यात वेगळेच शेतकरी ठरले आहेत.

हे देखील पाहा -

आधुनिकतेतून काळ्या आईची सेवा करण्याची परंपरा त्यांनी सोडली नाही. देवाला वाहण्याचे फूल आपल्या शेतीतून जावे, या तळमळीने त्यांनी घेतलेले कष्ट यशस्वी ठरले आहेत. दररोज दीड ते दोन हजार फुले बागेत बहरत आहेत. त्यातून मिळणाऱ्या पैशापेक्षा आत्मिक समाधान अधिक मोलाचे वाटते.अरुण काशिद हे प्रगतिशील शेतकरी आहेत. काशीद याना सोनचाफा या फुलांची अगदी शाळेत असल्यापासूनच आवड होती. काशीद सुरुवातीला शेतात उस, भात, सोयाबीन, कडधान्य तसेच वांगी, मिरचीसारखी भाजीपाला करीत होतो. एक वेगळा प्रयोग करावा म्हणून त्यांनी सोनचाफ्याची बाग फूलवली.

काशीद यांनी वीस गुंठे जागेत सुमारे दोनशे झाडे लावली आहेत. झाडांची काळजी घेताना त्याला फक्त शेणखत आणि स्लरी वापरले जाते. अवघा परिसर त्या फुलांच्या सुगंधाने दरवळून जातो. फुलांची संख्या वाढत असतानाच कोरोना महामारीने जग थांबले. फुले यायला सुरुवात होण्यास आणि कोरोनामुळे सर्व बंद होण्यास एकच वेळ झाली. त्यानंतर सलग सात महिने फुलांनी भरलेली झाडे चांगली तर वाटत होते.

Maval News
द्राक्ष बागायतदारांची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने वाईटही वाटत होते. पण काहीच पर्याय नव्हता. सध्या दररोज दोन हजार फुले येतात. कमीत कमी एक रुपया जास्तीत जास्त दोन रुपये भावाने सध्या फुलांची विक्री होते. तळेगाव, पिंपरी-चिंचवड, पुणे बाजारपेठेत फुले विक्रीसाठी जातात. अशी आवड म्हणून केलेली सोनचाफ्यांची बाग सध्या उत्पन्न मिळवून द्यायला लागली आहे.

फळ भाज्या, भात, उस, इतर भाज्या यासारखी पीके सर्वच शेतकरी घेतात.. परंतु आता शेतकरी देखील नवनवीन प्रयोग शेतीत करू लागला आहे. सोनचाफा याला देखील बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने शेतकऱ्यानी देखील परंपारीक शेती न करता आधुनिक शेती करून नफा मिळवावा असा संदेश काशीद कुटुंबियानी दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com