Aurangabad Market Yard: जाधववाडी भाजी मार्केटमध्ये तुफान गर्दी

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. मात्र बाजारातील गर्दी काही कमी होत नाही.
Aurangabad Market Yard: जाधववाडी भाजी मार्केटमध्ये तुफान गर्दी
Aurangabad Market Yard डॉ. माधव सवरगावे

औरंगाबाद - जिल्ह्यात भाजी मार्केट, बाजारपेठा लग्न समारंभ आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात आता आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे जाधववाडी भाजी मार्केटमध्ये (Vegetable Market) झालेल्या या तुफान गर्दीमुळे कोरोना (Corona) रुग्णांचा विस्फोट होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या निर्बंधाला सामोरे जावं लागण्याची भीती आहे.

हे देखील पहा -

जाधववाडीमध्ये आज हजारो लोक पहाटेपासून एकत्र आले आहेत. प्रचंड गर्दी, ना सोशल डिस्टनस, ना मास्क, सगळे कोरोनाचे वाहक अशी स्थिती आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. मात्र बाजारातील गर्दी काही कमी होत नाही. औरंगाबादच्या (Aurangabad) जाधववाडी भाजी मार्केटमध्ये दररोज अशी तुफान गर्दी होत असते. आजही तीच गर्दी दिसून आल्यानं कोरोना कसा कमी होणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Aurangabad Market Yard
PM Modi Security Breach: आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिवाय इतकी गर्दी झाल्यानंतर जिल्हा प्रशासन कारवाई का करीत नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. जाधव वाडी भाजी मार्केट (Vegetable Market) मध्ये सकाळी दररोज ग्रामीण भागातून शेतकरी (Farmer) भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. ही गर्दी कमी होण्याऐवजी अधिक वाढली असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील कोरोनाचा (Corona) धोका कमी होण्याऐवजी वाढणार हे मात्र निश्चित आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com