
नवनीत तापडीया
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबत नाही. आता सलग दुसऱ्या दिवशी आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. सिल्लोड तालुक्यातील बोदवड (Bodwad) येथील २८ वर्षीय नंदू भिमराव लाठे या तरुण (farmer) शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपवली. (Letest Marathi News)
शेतात कामाला जातो असे सांगून नंदू लाठे शेतात गेला. नित्याप्रणामे तो जेवणासाठी घरी आला नसल्याने गावालगत असलेल्या शेतात नातेवाईकांनी शोधाशोध केली. यावेळी त्यांना नंदू हा शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. त्यानंतर उपचारासाठी आधी सिल्लोड आणि नंतर (Aurangabad) छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारा दरम्यान या तरुण शेतकऱ्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
आत्महत्येचे सत्र सुरूच
कृषिमंत्री अब्दूल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. या आठवडाभरात चौथी शेतकरी आत्महत्या आहे. दरम्यान काल देखील एका बळीराजाने गळफास घेत आत्महत्या केली होती. यानंतर आत पुन्हा एका शेतकरीने आत्महत्या केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.