Aurangabad News: कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने मारली विहिरीत उडी; एका आठवड्यात तिसरी आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने मारली विहिरीत उडी; एका आठवड्यात तिसरी आत्महत्या
Farmer Aurangabad News
Farmer Aurangabad NewsSaam tv

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील शेतकऱ्याने (Farmer) विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची घटना उघडीस आली. सुरज उदयसिंग शेवगण असे शेतकऱ्याचे नाव आहे. (Live Marathi News)

Farmer Aurangabad News
Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातही पुन्हा अवकाळीचे ‘संकट’

सूरज शेवगण यांची पळसखेडा (ता. सोयगाव) शिवारात पाच एकर शेती आहे. शेती करण्यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. सतत नापीकीला सामोरे जावे लागत असल्याने हे कर्ज कसे फेडावे? या विवंचनेतून शेवगण यांनी विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. नातेवाईकांनी त्यांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. फर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद करण्यात आली आहे.

एका आठवड्यात तिसरी आत्‍महत्‍या

औरंगाबाद (Aurangabad News) जिल्‍ह्यात शेतकरी आत्‍महत्‍या हा आता चिंतेचा विषय होत चालला आहे. जिल्‍ह्यात काही दिवसात झालेली ही सहावी शेतकरी आत्‍महत्‍या आहे. तर कृषीमंत्र्यांच्‍या मतदार संघात एकाच आठवड्यात तिसरी आत्‍महत्‍या आहे. मागील आठवड्यातच एकाच दिवशी एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी आत्‍महत्‍या केली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com