
लातूर : अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. याकडे सरकार लक्ष देत नसून, शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याची संवेदनशीलता मुजोर विमा कंपन्यांवर कारवाई करण्याचे धैर्य आणि शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची सद्बुद्धी आघाडी सरकारला मिळावी, असे साकदे आई तुळजाभवानी देवीला आमदार अभिमन्यू पवार घालणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांसह लातुर जिल्ह्यातील औसा ते तुळजापूर पदयात्रा काढली जाणार आहे. या पदयात्रेला शनिवार १६ ऑक्टोबर दिवशी सकाळी ६ वाजता औसा येथून सुरुवात होणार आहे. तर आमदार राणाजगजितसिंह पाटील १७ आॅक्टोबरला औसा आणि तुळजापूर मतदारसंघाच्या सीमेवरून पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
हे देखील पहा-
या अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असताना आशा भीषण परिस्थिती महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी वेळसुद्धा नाही. हजारो हेक्टरवरील जमिन खरडून गेलेला शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. तर अतिवृष्टीने खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असताना ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना तातडीने भरीव निधी उपलब्ध ठाकरे सरकार करून देईल, असे अपेक्षित असताना या सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे.
असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. यामुळे ओला दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे असंवेदनशील आघाडी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि निद्रिस्त आघाडी सरकारला खडबडून जागं करण्यासाठी शेतकऱ्यांसह औसा ते तुळजापूर पदयात्रा काढली जाणार आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्यायला अद्याप मुख्यमंत्री मराठवाड्यात आले नाही. कृषिमंत्री. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर होईल, अशी अपेक्षा होती ती देखील फोल ठरली आहे.
एप्रिल २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तुटपुंजी भरपाई सरकारने ६ ऑक्टोबर दिवशी ६ महिने उशिरा जाहीर केली आहे. सरकारचा लातूर प्रती दुजाभाव इतका की त्यात लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १ रुपयाची सुद्धा मदत देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांप्रती आघाडी सरकार गंभीर नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे औशाचे आमदार अभिमन्यू पवार आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील शेतकऱ्यांसह या पदयात्रेत सहभागी होणार आहोत.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.