Baramati News : निमगाव केतकीत प्रहार जनशक्ती, शेतकरी संघटनेचा रास्ता राेकाे; बारामती- इंदापूर महामार्गाची वाहतुक ठप्प

यावेळी पाेलिसांचा घटनास्थळी बंदाेबस्त हाेता.
baramati, rasta roko andoaln, farmers, milk price
baramati, rasta roko andoaln, farmers, milk pricesaam tv

Baramati News : बारामती जिल्ह्यात दूध दरवाढीच्या मागणीसाठी निमगाव केतकी येथे शेतक-यांनी रास्ता राेकाे आंदाेलन केले. यामुध्ये बारामती- इंदापूर राज्य महामार्गावरील वाहतुक सुमारे अर्धा तासाहुन अधिक काळ ठप्प (baramati indapur highway traffic updates) झाली. जिल्हा विकास अधिकारी विकास डोइफोडे यांनी आंदाेलकांची भेट घेत त्यांचे निवेदन स्विकारल्यानंतर शेतक-यांनी आंदाेलन मागे घेतले.  (Maharashtra News)

baramati, rasta roko andoaln, farmers, milk price
Success Story : कडू कारल्याची गोड कहाणी; मावळातील शेतक-याने एक एकरातून कमाविले साडेतीन लाख

गाईच्या व म्हशीच्या दुधाला शासनाचा हमीभाव (milk price) मिळावा. खाजगी दूध संघावर शासनाचे नियंत्रण राहिले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेतक-यांनी आज (शनिवार) निमगाव केतकी येथे रास्ता रोको आंदाेलन छेडलं.

बारामती - इंदापूर राज्य महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्यावतीने सुमारे अर्धातासाहुन अधिक वेळ रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहुतकीचा खाेळंबा झाला.

baramati, rasta roko andoaln, farmers, milk price
Satara News : युवा नेते भाऊ जाधव हल्लाप्रकरणी युवकास अटक, माहूलीत कडकडीत बंद

दुधाला हमीभाव मिळावा. उस दराप्रमाणे दुधाला 70 - 30 चा कायदा लागू झाला पाहिजे. गाई म्हशींना शासकीय विमा मिळावा इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील दूध उत्पादकाला पाच रुपये लिटर शासकीय अनुदान मिळावे. पशु वैद्यकीय सेवा व हंगामी लसीकरण झाले पाहिजे. दुग्ध व्यवसायासाठी शासनाकडून विनाअट सबसिडी देऊन कर्ज पुरवठा करावा आदी मागण्यांसाठी हे आंदाेलन छेडण्यात आले. या आंदाेलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

जिल्हा विकास अधिकारी विकास डोइफोडे यांनी आंदाेलकांचे निवेदन स्विकारले. दूधाला दर वाढ मिळत नसल्याने भडकलेल्या शेतक-यांनी जाेरदार घाेषणा दिल्या. त्यानंतर शेतक-यांनी आंदाेलन मागे घेतले. यावेळी पाेलिसांचा घटनास्थळी बंदाेबस्त हाेता.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com