कोरोनामुळे आठवडी बाजारात बसू दिलं नाही; संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला!

बीड प्रशासनाची हिटलरशाही; निवडणुकीत राजकीय नेत्यांकडून कोरोना नियमांचा फज्जा, तर शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र नियमांवर बोट..!
कोरोनामुळे आठवडी बाजारात बसू दिलं नाही; संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला!
कोरोनामुळे आठवडी बाजारात बसू दिलं नाही; संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला!SaamTvNews

बीड : बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत असून यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजारांवर काहीसे निर्बंध लादले गेले आहेत. याच अनुषंगाने बीडच्या (Beed) माजलगावमध्ये आज, प्रशासनाकडून आठवडी बाजारात (Weekly Market) शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यासाठी बसू दिलं गेलं नाही. शेतकऱ्यांनी (Farmers) विनंत्या केल्या मात्र कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही.

हे देखील पहा :

यामुळं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला (Vegetables) भर रस्त्यावर फेकून, शासनाचा निषेध करत तर रोष व्यक्त केला. तर दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकांमध्ये (Nagar Panchayat Elections) कोरोना नियमांचा पूर्णतः फज्जा पाहायला मिळाला. आज वडवणी, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर मध्ये हजारो राजकीय कार्यकर्त्यांसह त्यांचे नेते रस्त्यावर आले होते.

कोरोनामुळे आठवडी बाजारात बसू दिलं नाही; संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला!
Nagpur : कर्जबारीपणामुळे संपवलं कुटुंब; बायकोसह दोन मुलांची हत्या केली स्वतःही गळफास घेतला!

मात्र, याकडे कोणत्याच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही. तर दुसरीकडे या शेतकऱ्यानं बाबतीत प्रशासनाच्या या भूमिकेने, शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना जो नियम लागू केला आहे. त्यानुसार कोरोना (Corona) नियमांचा फज्जा मांडणाऱ्या राजकीय नेत्यांवर, गुन्हा दाखल होणार का? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष्य लागले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com