भुईमूग राखणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने भोसकून खून

घटनास्थळी सापडल्या चिठ्ठ्या; चिठ्ठीत "माझ्या बायकोच्या खुनाचे आरोपी जेरबंद होत नाहीत, तोपर्यंत खुनाचे सत्र सुरूच राहणार", असा उल्लेख
भुईमूग राखणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने भोसकून खून
Shirur Police Station Saam Tv

बीड - भुईमुगाची राखण करणाऱ्या एका 65 वर्षीय वृद्धाचा, अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने पाठीत भोसकून खून केला आहे. तर दुसऱ्या घटनेत एका वृद्धावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने, तो गंभीर जखमी झाला आहे. या दोन्ही घटना बीडच्या (Beed) शिरूर कासार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. कुंडलिक सुखदेव विघ्ने वय 65 रा. आनंदगाव ता. शिरूर कासार असं खून करण्यात आलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे. तर नारायण गणपत सोनवने वय 56 रा. खांबा ता. शिरूर (Shirur) कासार हे गंभीर जखमी झाले आहेत.

विशेष म्हणजे या दोन्ही घटनास्थळी एक- एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत म्हटलंय की, "माझ्या बायकोचा खून झाला आहे, जोपर्यंत बायकोच्या खुनाचे आरोपी जेरबंद केले जाणार नाहीत, तोपर्यंत खुनाचे सत्र सुरूच राहील". अशा आशयाची चिठ्ठी सापडल्याने परिसरात एकचं खळबळ उडाली आहे.

हे देखील पाहा -

गेल्या दोन दिवसांपुर्वी खांबा गावातील जखमी नारायण गणपत सोनवने हे आपल्या शेतात झोपले होते. यादरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न करत हल्ला चढवला. या हल्ल्यात सोनवणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर, बीडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुसऱ्या दिवशी रात्री कुंडलीक सुखदेव विघ्ने हे, आनंदगाव येथील आपल्या शेतात भुईमूग राखणदारीसाठी गेले असता, त्यांच्यावर अज्ञातांनी धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Shirur Police Station
प्रेम विवाह करणाऱ्या तरुणीची आई वडिलांच्या तावडीतून सुटका

दरम्यान या दोन्ही गावात घडलेल्या घटनास्थळी चिठ्ठी आढळून आले आणि या चिठ्ठीत खुलं आव्हान दिल्याचं सांगितलं जातंय. वेगवेगळ्या व्यक्तीची नावे देखील यामध्ये टाकले असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्यामुळं आता हा खुनी हल्लेखोर कोण आहे ? तो हे हल्ले का करतोय ? याचा तपास शिरूर कासार पोलीस करत असून हल्लेखोरांचा शोध लावणं, पोलिसांसमोर आव्हान ठरलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.