निसर्गाचा अद्भुत चमत्कार; केज तालुक्यात 3 झाडाविषयी चर्चा

तीन पक्षाच्या सरकारानंतर 3 झाडांची गावखेड्यात चर्चा
Beed Trees
Beed Trees विनोद जिरे

बीड : आतापर्यंत आपण तीन पक्षाच्या सरकारच्या बातम्या पाहिल्या आहेत. मात्र, आज आपल्याला, एकाच झाडाला तिन वेगवेगळे वृक्ष आल्याची बातमी दाखवणार आहोत. जी बातमी पाहून आल्यालाही निसर्गाच्या अद्भुत चमत्काराचे एक प्रकारे दर्शन होणार आहे.

हे देखील पाहा-

बीडच्या केज(kej) तालुक्यात असणारे चंदन सावरगाव गावातील (village) शेतकरी शत्रुघ्न तपसे त्यांच्या घराच्या दारासमोर, गेल्या ३० ते ३५ वर्षांपूर्वी एक गुलमोहरचं झाड लावण्यात आले होते. मात्र काही वर्षांपूर्वी या गुलमोहराच्या झाडाच्या फांदीवर चक्क वडाचे आणि पिंपळाचे दोन वेगवेगळे वृक्ष (trees) आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महत्वाचे समजले जाणारे आणि शुद्ध ऑक्सीजन (Oxygen) देणारे, हे वृक्ष झाडाच्या फांदीवर डौलदार उभा ठाकलेत. विशेष म्हणजे भर उन्हाळ्यातही त्रिवेणी संगम असणारं हे महाकाय वृक्ष हिरवीगार शालू पांघरून उभा आहे. याविषयी शेतकरी म्हणाले, की साधारण ३० वर्षांपूर्वी माझ्या बंधूंनी गुलमोहराचं झाड आणला होते. ते आम्ही आमच्या परसबागेत लावण्यात आले होते.

Beed Trees
कोळशाच्या संकटामुळे रेल्वे प्रवाशांच्या अडचणीत वाढ; तब्बल 1100 गाड्या रद्द

मात्र, झाड लावल्या नंतर काही वर्षानंतर, त्या झाडावर एक वडाचे आणि पिंपळाचे झाड आले आहे. त्याला पाणी देत राहिलो, ३० वर्षानंतर आजपर्यंत या निसर्गाचा चमत्काराचे गमक कळाले नाही. आज काल ३ जाती धर्माचे लोक मिसळून राहत नाहीत. मात्र, निसर्गाने ३ वेगवेगळे झाड दिलेत. काही दिवसांपूर्वी अनेक लोक म्हणाले, की ३ झाड दारात असू नयेत. मात्र, महाराष्ट्रात ३ पक्षाचे सरकार असू शकते, मग माझ्या दारात ३ झाड का असू शकत नाहीत. या त्रिवेणी संगम असणाऱ्या झाडांमुळे खूप आनंद आहे, समाधान आहे. अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यानी दिली आहे. दरम्यान निसर्गाचा हा अद्भुत चमत्काराचा ठेवा ३ झाडाच्या रूपानं चंदनसावरगाव या गावामध्ये उभा ठाकला आहे. त्यामुळे आता या झाडाची आणि गावाची चर्चा पंचक्रोशीतील गाव खेड्यात होऊ लागली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com