बीड जिल्ह्यात पावसाचा कहर! पिकांमध्ये आठ दिवसांपासून गुडघाभर पाणी

अनेक नद्यांचं पाणी शेतामध्ये घुसलं आहे. यामुळे लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यात पावसाचा कहर! पिकांमध्ये आठ दिवसांपासून गुडघाभर पाणी
बीड जिल्ह्यात पावसाचा कहर! पिकांमध्ये आठ दिवसांपासून गुडघाभर पाणीविनोद जिरे

बीड जिल्ह्यात (Beed District) गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे, जिल्ह्यातील सर्वच लघु- मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो होऊन वाहत आहेत. तर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, सिंदफणा, मांजरा, बिंदुसरा, कुंडलिका, मनकर्णिका यासह जवळपास सर्वच गाव नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक नद्यांचं पाणी शेतामध्ये घुसलं आहे. यामुळे लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहेत. जिल्ह्यातील बीड, गेवराई, शिरूर कासार, वडवणी, माजलगाव, आष्टी, धारूर यासह सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाला आहे.

बीड जिल्ह्यात पावसाचा कहर! पिकांमध्ये आठ दिवसांपासून गुडघाभर पाणी
Solapur : ओढ्यात वाहून जाणाऱ्या तरुणाचे गावकऱ्यांनी वाचवले प्राण!

तर बीड तालुक्यातील खामगाव परिसरातून वाहणाऱ्या सिंदफणा नदीला, गेल्या तीन दिवसांपासून पूर असल्याने, या नदीचे पाणी शेतामध्ये घुसलं आहे. यामुळं पिकं पाण्याखाली गेले आहे. तर शेतात राहणाऱ्या बुधनर नामक शेतकऱ्याचं घर देखील वाहून गेलंय. सध्या पूर काहीसा कमी झाला असला तरी गेल्या पाच सहा दिवसांपासून खामगाव परिसरातील पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याने बीड जिल्ह्याला अलर्ट दिला होता. महाराष्ट्राच्या अनेक भागात अचानक पाऊस झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com