
बीड: महावितरणच्या (MSEDCL) गलथान कारभारामुळे शॉर्टसर्किट होऊन अनेक शेतकऱ्यांचे (farmers) ऊस जळाल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील. मात्र, बीडमध्ये (Beed) अशी एक घटना समोर आली आहे, की त्याची बातमी पाहून आपणही चक्रावून जाणार आहे. आपल्या शेतातील उसाचे पाचट जाळण्याच्या नादात, शेजारच्या शेतकऱ्यांना याची मोठी किंमत मोजावी लागली आहे.
हे देखील पहा-
ऊसाचे (Sugarcane) पाचट जाळत असतांना, लावलेली आग क्षणात मोठी झाली अन् शेजारच्या ४ शेतकऱ्यांचा जवळपास ५ एकर ऊस जळून खाक झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना बीडच्या खापर पांगरी गावात (village) उघडकीस आली आहे. बीडच्या खापर पांगरी गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील ऊसाचे पाचट पेटवले आहे.
मात्र, काही क्षणात वाऱ्याने आग पांगली गेली. आणि यातच शेजारच्या ऊसाला भीषण आग (Fierce fire) लागली. अशी प्राथमिक माहिती ग्रामस्थांनी (villagers) दिली आहे. तर या लागलेल्या भीषण आगीत विठ्ठल खामकर, बाळू खामकर, नारायण खामकर, सुधाकर चव्हाण या ४ शेतकऱ्यांचा जवळपास ५ एक्कर ऊस जळून खाक झाला आहे. यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचं नुकसान झाले आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.