Beed: शॉक लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; रानडुकरांपासुन संरक्षणासाठी शेतात लावली होती तार

शॉक लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; रानडुकरांपासुन संरक्षणासाठी शेतात लावली होती तार
Beed News Farmer Death
Beed News Farmer DeathSaam tv

बीड : रानडुकरांपासुन संरक्षण मिळावे यासाठी ऊसाला तार लावून त्‍यात करंट सोडले होते. या तारेचा शॉक लागुन 40 वर्षीय शेतकऱ्याचा (Farmer) दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच एका शेळीचा देखील शॉक लागून मृत्यू झाला आहे. (Beed News Farmer Death)

सदर दुर्दैवी घटना बीडच्या (Beed News) गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावात उघडकीस आलीय. नंदु उद्धव थोपटे (वय 40) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. मयत शेतकरी थोपटे हे शेतात काम करून घरी जात होते. सोबत असलेली शेळी ऊसात गेली. यावेळी तिला पाहण्यासाठी गेलेल्या मृत नंदू थोपटे यांना रानडुकरांपासुन संरक्षण मिळावे यासाठी लावलेल्या तारेचा शॉक (Electric Shock) लागला. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान मयत शेतकऱ्याचा मृतदेह, शवविच्छेदनासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालय दाखल केला असून याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची अकस्मात नोंद करण्यात आली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com