शेतात नांगरणी करतांना शेतकऱ्याचा करंट लागून मृत्यू

शेतात नांगरणी करतांना शेतकऱ्याचा करंट लागून मृत्यू
शेतात नांगरणी करतांना शेतकऱ्याचा करंट लागून मृत्यू
FarmerSaam tv

बीड : शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत असतांना विद्युत प्रवाह सुरू असलेल्या वायरचा करंट लागल्याने 48 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बीडच्या (Beed) राजपिंपरी शिवारात घडल्याचे उघडकीस आले आहे. (beed news Farmer dies of electrocution while plowing in field)

म्हाडा कॉलनी (गेवराई) येथील संजय बर्गे (वय 48) असे मयत शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. बर्गे हे त्यांच्या राजपिंपरी शिवारातील शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरटी करत होते. या दरम्यान ट्रॅक्टरच्या वरून गेलेल्या विजेच्या वायरला ट्रॅक्‍टरचा धक्‍का लागला. यामुळे विद्युत प्रवाह ट्रॅक्‍टरमध्‍ये आल्‍याने बर्गे यांना करंट लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. याप्रकरणी बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com