Beed: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किसान सभा आक्रमक; बीडच्या वडवणीत चक्काजाम आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किसान सभा आक्रमक; बीडच्या वडवणीत चक्काजाम आंदोलन
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : कृषी कायद्या विरोधात आंदोलन केल्याने दाखल केलेले गुन्हे मागे घ्या; या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने आज बीडच्या (Beed) वडवणी शहरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे चक्का जाम आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. (Beed News Farmer Agresive)

संयुक्त किसान मोर्चाच्या किसान आंदोलनात सरकारने शेतकऱ्यांवर (Farmer) दडपशाहीने दाखल केलेले सर्व गुन्हे परत घ्या. रासायनिक खतांच्या किंमती कमी करुन खतांचा काळाबाजार थांबवा. शेती उपयोगी सर्व साहित्य जीएसटी कक्षेतून वगळून ते मोठ्या अनुदानावर व मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या. सर्व प्रलंबित पीक विम्याचे शेतकऱ्यांना लवकरात लवकर वाटप करा. यासह विविध मागण्सांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेने हे आंदोलनं केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com