Lumpy Disease: लंपीचा प्रादुर्भाव वाढला; अंबाजोगाई तालुक्यात 62 जनावरे दगावली

लंपीचा प्रादुर्भाव वाढला; अंबाजोगाई तालुक्यात 62 जनावरे दगावली
Lumpy Disease
Lumpy DiseaseSaam tv

बीड : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात लंपीच्या आजारामुळे तीन महिन्यात 62 जनावरे दगावली आहेत. तर बाधीत 230 जनावरांवर औषधोपचार (Beed News) सुरू आहे. औषधोपचार सुरू असताना देखील प्रसार वाढत आहे. (Breaking Marathi News)

Lumpy Disease
Chandrapur News: छेडछाड करणाऱ्या मजनूला चोप; व्‍हीडीओ झाला व्‍हायरल

अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यात लंपीच्या प्रादुर्भावामुळे 62 जनावरे दगावल्याची माहिती समोर आली आहे. 37 हजार गाय वर्गीय पशुधन तालुक्यात आहे. 100 टक्के लसीकरण केल्याचा दावा पशुवैद्यकीय विभागाने केला असला तरी अद्यापही 230 जनावरांना लंपीची (Lumpy Disease) लागण झाल्याचे आढळून आले.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

लंम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने पशुपालक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या जनावरांवर वेळोवेळी औषधोपचार करण्यात येत आहेत. तरीसुद्धा पशु मालकांना लंपीच्या प्रादुर्भावाने हवालदिल केले आहे. शेतकऱ्यांनी जनावराच्या गोठ्यातील स्वच्छता ठेवून लंपीच्या आजारापासून जनावरांना सुरक्षित ठेवावे. असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com