..अन्यथा मुख्यमंत्र्यांचा दौरा आडवू; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसेचा मुख्यमंत्र्यांना इशारा

..अन्यथा मुख्यमंत्र्यांचा दौरा आडवू; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसेचा मुख्यमंत्र्यांना इशारा
Beed News MNS
Beed News MNSSaam tv

बीड : मराठवाड्यातील शेत पिकांच्या नुकसानग्रस्त भागाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौरा करत आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आमच्या वडवणी तालुक्यातील अतिवृष्टी भागाचा दौरा करावा. अन्यथा त्यांचा दौरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS) आडवू आम्ही दौरा करू देणार नाही; असा सज्जड इशारा मनसेचे बीड (Beed) जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे यांनी दिलाय. (Beed News MNS Aggressive farmers issues)

Beed News MNS
Jalgaon: ‘हर घर तिरंगा’...दिव्‍यांग महिला दिवसाला तयार करताहेत १००० राष्ट्रध्वज

मायबाप सरकार आम्हाला शेतात जायला रस्ता नाही, अतिवृष्टीने (Heavy Rain) पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्या. अशी व्यथा आणि मागणी वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी (Farmer) मांडली. आज बीडच्या वडवणी शहरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेने बीड- परळी राज्य महामार्ग अडवत चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. यादरम्यान शेतकरी बोलत होते. यावेळी मनसेने केलेला चक्काजाम आंदोलनातून, वडवणी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, 2020 चा पीकविमा (Crop Insurance) तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा. वडवणी तालुक्यात सतत ढगफुटी सदृश्य पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्या.

मनसेच्‍या आंदोलनादरम्‍यान मागण्या

ई- पिक पाहणीची अट रद्द करुन या वर्षीचा पिक विमा तात्काळ देण्यात यावा. साखर आयुक्ताच्या परवानगीशिवाय कारखान्यातील वजन काट्याला छेडछाड़ करण्यात येऊ नये, असे आदेश काढण्यात यावेत. वडवणी तालुक्यातील निराधार लोकांच्या फाईल तात्काळ मंजुर करुन जाचक अटी तसेच क्रॉस चेकिंग रद्द करण्यात यावी.

वडवणी तालुक्यातील जि. प. अंतर्गत जिल्हा नियोजन गट- अ आणि ब यामधील कामे न करता बोगस बिले उचलणाऱ्या संबंधीत अधिकारी व गुत्तेदारावर तात्काळ गुन्हे दाखल करा. मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत बोगस व निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. वडवणी तालुक्यातील महाविरतण कंपनीच्या लोंबकाळलेल्या तारा तात्काळ दुरुस्त करा. यासह 14 मागण्यांसाठी मनसे सैनिक आज आक्रमक झाले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com