बीडमध्ये युवा नेत्यांना उत; तलवारीने कापले 50 केक तर JCB मधून जीवघेणा स्टंट

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने जवळपास 6 लाख 56 हजार 847 शेतकऱ्याचं, 8 लाख 98 हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टी बाधित झाल्याची नोंद शासन दरबारी आहे.
बीडमध्ये युवा नेत्यांना उत; तलवारीने कापले 50 केक तर JCB मधून जीवघेणा स्टंट
बीडमध्ये युवा नेत्यांना उत; तलवारीने कापले 50 केक तर JCB मधून जीवघेणा स्टंटSaam TV

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर केला अन होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळं कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर अनेक शेतकऱ्यांची दिवाळी मदतीच्या प्रतीक्षेत गेली. आजही हजारो अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र दुसरीकडे याच अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि आमदार होऊ पाहणारे भाजप राष्ट्रवादीचे युवा नेते, वाढदिवसानिमित्त जल्लोष साजरा करत आहेत.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने जवळपास 6 लाख 56 हजार 847 शेतकऱ्याचं, 8 लाख 98 हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टी बाधित झाल्याची नोंद शासन दरबारी आहे. तर याच अतिवृष्टीच्या मदतीसाठी आजही शेतकरी प्रतीक्षेत आहेत. मात्र एवढं सगळं असताना, आमदार होऊ पाहणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवसानिमित्त, जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

बीडमध्ये युवा नेत्यांना उत; तलवारीने कापले 50 केक तर JCB मधून जीवघेणा स्टंट
अहमदनगरमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे नुकसान

गेल्या चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे युवा नेते तथा धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय विजयसिंह पंडित यांचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी जेसीबी च्या माध्यमातून जवळपास पंधरा ते वीस फूट उंच जात, जीव घेना स्टंट करण्यात आला. यादरम्यान जेसीबीच्या खोऱ्यामध्ये माणसं मावत नव्हते, एवढे त्यामध्ये उभे ठाकले होते. यामुळे विजयसिंह पंडित यांचा जीव धोक्यात होताच, मात्र त्यांनी इतर कार्यकर्त्यांचा देखील जीव धोक्यात टाकला. गोदापात्राने गेवराई पट्ट्यातील शेतकऱ्यांचे होत्याचं नव्हतं झालं. मात्र त्याच गेवराईमध्ये आमदार होऊ पाहणार्‍या पंडितांकडून, हा जल्लोष साजरा करण्यात आला.

तर काल रात्री माजलगाव मतदार संघाचे आमदार होऊ पाहणाऱ्या तथा पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय बाबरी मुंडे या भाजपच्या युवा नेत्याने, चक्क तलवारीने तब्बल 50 केक कापले, यावेळी वडवणी शहरात अनेक ठिकाणी तलवारीने केक कापण्याचा प्रकार देखील घडल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे बाबरी मुंडेंनी ज्यावेळेस तलवारीने केक कापले, त्याच्या काही तासांपूर्वीच खासदार प्रितम मुंडे यांनी देखील, बाबरी मुंडेंचा वाढदिवस केक कापून साजरा केला होता. त्यानंतर संध्याकाळी डीजेच्या तालावर या भाजपच्या युवा नेत्याने ठेका देखील धरला. जिल्ह्यात सर्वात जास्त ढगफुटी याच वडवणी तालुक्यात झाली आणि याच वडवणीचा आमदार होऊ पाहणाऱ्या बाबरी मुंडेंकडून, वाढदिवसाचा असा जल्लोष करण्यात आल्यानं, शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

बीडमध्ये युवा नेत्यांना उत; तलवारीने कापले 50 केक तर JCB मधून जीवघेणा स्टंट
अकोला बाजार समितीत सोयाबीन साडे आठ हजारांवर; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

तर या विषयी शेतकरी नेते भाई मोहन गुंड म्हणाले, की बीड जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान तसेच पिक विम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. दुसरीकडं बीड जिल्ह्यातील युवा नेत्यांना, ज्यांचे स्वप्न आमदारकी मिळविण्याचे आहे, अशा नेत्यांना वाढदिवस साजरी करण्याचा एक मानसिक रोग लागलेला आहे. गेवराईचे विजयसिंह पंडित असतील की वडवणीचे बाबरी मुंडे असतील यांनी वाढदिवसाचा जल्लोष केला. बाबरी मुंडे यांनी काल वाढदिवस करताना तलवारीने तब्बल 50 केक कापले. त्यामुळे या नेत्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही करत आहोत. एकीकडे अतिवृष्टीने शेतकरी हतबल झालाय तर दुसरीकडं हे युवा नेते वाढदिवसाच्या जल्लोष करतात. हे जिल्ह्याचं दुर्दैव आहे. अशी प्रतिक्रिया भाई मोहन गुंड यांनी दिली आहे.

तर या विषयी गेवराई विधानसभेचे आमदार लक्ष्मण पवार म्हणाले, की आज पर्यंत मी माझी एकही विजय मिरवणूक या गेवराईमध्ये काढली नाही. मात्र या ठिकाणी वाढदिवसाचा जल्लोष केला जात आहे. मला तर हा केवळ बालिशपणा वाटतोय. खरं प्रेम असेल तर लोक भेटून पुष्पगुच्छ देतात. आजची परिस्थिती खूप वाईट आहे, शेतकरी अडचणीत आहे. अतिवृष्टीने शेतकरी हतबल झालाय, किमान आजच्या परिस्थितीमध्ये देखील हे योग्य नाही, हे खूप दुर्दैव आहे. अशी प्रतिक्रिया लक्ष्मण पवार यांनी दिली आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यात लाखो हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. अध्याप अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत पोहोचली नाही. कित्येकांनी आत्महत्या देखील केल्यात, आज सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. मात्र एवढं सगळं सुरू असताना, याच सर्वसामान्य लोकांच्या मतदानावर आमदार होऊ पाहणाऱ्या युवा नेत्यांना, तारतम्य राहिलं नाही. यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com