पिक कर्जापासून शेतकरी वंचित; केवळ ३७ टक्‍के कर्ज वाटप

पिक कर्जापासून शेतकरी वंचित; केवळ ३७ टक्‍के कर्ज वाटप
Crop Loan
Crop LoanSaam tv

भंडारा : कोणी कर्ज देता का कर्ज.. ही ऑर्त हाक भंडारा जिल्ह्यातील शेतकरी देत असून जिल्ह्यात अनेक शेतकरी पिक कर्जापासून अद्यापही वंचित आहेत. त्यामुळे पिक कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना (Farmer) पायपीठ करावी लागते आहे. त्यामुळे जिल्हातिल बँक खरीप पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ठ गाठेल का? हा प्रश्न ही निर्माण झाला आहे. (bhandara news Farmers deprived of crop loans Only 37 percentage loan disbursement)

Crop Loan
अंगावर विज पडल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

भंडारा (Bhandara) जिल्हा हा धान उत्पादन जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी भात पिक घेत असतात. त्यामुळे नुकतेच खरीप हंगाम लागल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेतात लगबग दिसत आहे. यात मशागती पूर्व करावा लागणारा खर्च, लागवड खर्च, पेरणी खर्च, कापणी खर्च आदी अनेक ख़र्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. हे सर्व खर्च भागविण्यासाठी पैशांची गरज असल्याने जिल्ह्यातील शेतकरी पिक कर्जासाठी बँकेच्या (Bank) खेटा घालत असतात.

मग सावकारापुढचे रहावे लागते उभे

जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पिक कर्ज (Crop Loan) मिळत असले तरी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळत नाही. शेतकऱ्यांच्या हातात खरिपाच्या तोंडावर पैसे नाही. पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध बँकांमध्ये पीक कर्जासाठी अर्ज केले आहे. मात्र जिल्ह्यात आतापर्यंत उद्दिष्टाच्या 37 टक्के कर्ज वितरण करण्यात आले. आजही शेकडो शेतकरी कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजविताना दिसत आहेत. घरात धान आहे; परंतु आधारभूत खरेदी केंद्रावर विकायची सोय नाही. दुसरीकडे बँका कर्ज देताना हात आकडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारातच उभे रहावे लागत असल्याची वेळ आली आहे.

अद्याप ३७ टक्‍केच कर्ज वाटप

भंडारा जिल्ह्याच्या विचार केला असता एकूण 64 हजार 656 सभासद शेतकरी असून 802 कोटी रूपयांचे कर्ज वाटप उद्दिष्ट बँकेपुढे आहे. आतापर्यंत 365 कोटी 55 लाख रूपयांचे कर्ज बँकेने वाटप केले आहे. यात विशेष बाब अशी एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने 306 कोटी 6 लाख पिक कर्ज वाटप करत अव्वल नंबर मिळविला असून खाजगी बँक 30 कोटी 56 लाख, ग्रामीण बँक 28 कोटी 99 लाख इतक्या कमी उद्दीष्टवर आहे. हे सर्व बँक कर्जाचे वाटप लक्षात घेता केवल 37 टक्के कर्ज वाटप झाले आहे. अजुनही 63 टक्के शेतकरी पिक कर्जापासून वंचित आहे. त्यामुळे कागदी बाजारात जिल्ह्यातील शेतकरी फसले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com