पिंपळगाव काळे येथील शेतातील मक्याच्या गंजीला आग...

150 क्विंटल मका जळून खाक, 2 लाख रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान
पिंपळगाव काळे येथील शेतातील मक्याच्या गंजीला आग...
पिंपळगाव काळे येथील शेतातील मक्याच्या गंजीला आग...संजय जाधव

बुलढाणा - जळगांवजामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील शिवारातील माजी सरपंच संतोष गोपाळ जवरे यांच्या शेतातील मका हे पीक गंजी करून ठेवले होते. काल सकाळी दहा वाजेच्या दरम्यान संबधित शेतकरी शेतात गेले असता मक्याच्या उभ्या गंजिला आग लागलेली दिसली. या आगीत सर्व मका जळून खाक झाला होता.

हे देखील पहा -

ह्या आगीत जवळपास 150 ते 160 क्विंटल मका जळून खाक झाला आहे. त्याची किंमत अंदाजे दोन लाख रुपया पर्यंत एवढी आहे. या घटनेची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी जळगावजामोद पोलीस स्टेशनला दिली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जामदार वानखेडे हे करीत आहेत.

पिंपळगाव काळे येथील शेतातील मक्याच्या गंजीला आग...
उल्हासनगरमध्ये फुटपाथवर महापालिकेची धडक कारवाई

एवढ्या मेहनतीने शेतकरी पीक शेतात पिकवतो शेवटी कोणीतरी अज्ञात व्यक्ती येऊन आग लावून जातो त्यावेळी शेतकरी उध्वस्त होतो अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे, सरकारने तात्काळ दखल घेऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com