Buldhana News: शेगाव तालुक्यातील शेतकरी अजूनही पिकविम्‍यापासून वंचित; कोट्यावधी रुपयांचा पीकविमा बाकी

शेगाव तालुक्यातील शेतकरी अजूनही पिकविम्‍यापासून वंचित; कोट्यावधी रुपयांचा पीकविमा बाकी
Buldhana News Crop Insurance
Buldhana News Crop InsuranceSaam tv

बुलढाणा : जिल्ह्यातील लाखो शेतकरी पीकविम्याची रक्कम मिळण्यापासून वंचित आहेत. पिक विम्‍यासाठी प्रत्येक तालुक्यातील शेकडो शेतकरी (Farmer) जिल्हा कचेरीच्या पायऱ्या झिझवत आहेत. मात्र अद्यापपर्यंत पीकविम्याची (Crop Insurance) रक्कम न मिळाल्याने शेतकरी वंचित आहेत. (Tajya Batmya)

Buldhana News Crop Insurance
Dhule News: मनपा आयुक्त कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न; अतिक्रमणाला कंटाळला होता इसम

खरीपाचा हंगाम सुरु होत आहे. शेतकऱ्यांजवळ पेरणीसाठी खत बियाने घेण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. शेतकरी क्रांती संघटनेच्यावतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आज शेतकऱ्यांनी धडक देत पीकविम्याच्या रकमेची मागणी केली आहे. शेगाव (Shegaon) तालुक्यातील हजारो शेतकरी या पीकविम्याच्‍या रक्‍कमेपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.

Buldhana News Crop Insurance
Baramati News: शेतजमिनीचा वाद; तहसील कार्यालय आवारात शेतकऱ्याने घेतले पेटवून

तर त्‍यांना चोप देऊ

नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन शेतकरी शेगावकडे निघून गेले आहे. सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आता जर दहा दिवसात पीकविम्याची रक्कम मिळाली नाही. तर अधिकारी व पीकविमा कंपनीच्या कर्मचार्यांना चोप देऊ असा इशारा शेतकरी क्रांती संघटनेचे गजानन बोलेवार यांनी दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com