दुर्देवी! वीज पडून बैलाचा मृत्यू; ऐन पेरणीच्या तोंडावर बैल गमावल्याने शेतकरी हतबल

खरीप हंगामाच्या पेरणीच्या आधीच बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
दुर्देवी! वीज पडून बैलाचा मृत्यू; ऐन पेरणीच्या तोंडावर बैल गमावल्याने शेतकरी हतबल
NandurbaarSaam TV

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील विसरवाडी आणि खांडबारा परिसरात मान्सूनचा पहिला पाऊस विजांच्या कडकडाटासह २० ते २५ मिनिटे जोरदार बरसला. या पावसादरम्यान खांडबारा परिसरातील श्रावणी गावातील समट्या भुऱ्या कोकणी या शेतकऱ्याचा (Farmer) शेतात पळसाच्या झाडाला बांधलेल्या बैलावर वीज पडल्याने बैल (Bull) जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

शिवाय एक बैल दूर अंतरावर बांधला असल्याने सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत. खरीप हंगामाच्या पेरणीच्या आधीच वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी हतबल झाला असून प्रशासनाने तत्काळ नुकसानभरपाई (Compensation) द्यावी अशी मागणी शेतकरी समट्या भुऱ्या कोकणी यांनी केली आहे.

हे देखील पाहा -

नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar District) पावसाचे प्रमाण कमी असले तरी सलग दुसऱ्या दिवशी वीज पडून जीवितहानी झाल्याची घटना घडली आहे. काल झालेला पाऊस नवापूर तालुक्यातील विसरवाडी, खांडबारा परिसर तसेच शहादा तालुक्यातील (Shahada Taluka) चिनोदा परिसर आणि सातपुडा अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती.

ठराविक ठिकाणी मान्सूनचे आगमन झाल्याने अद्यापही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाऊस झालेला नाही. त्यामुळे धुळे जिल्हावासियांना दमदार मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com