PM Kisan: योजनेत परत करण्यात आला बदल; जाणून घ्या सर्वकाही..!

देशात शेतकऱ्यांसाठी 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना' चालवली जात आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv

नवी दिल्ली: देशात शेतकऱ्यांसाठी 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना' चालवली जात आहे. जर तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थ्यांपैकी (Beneficiaries) एक असाल तर तुमच्याकरिता देखीलदेखील ही बातमी खूप महत्त्वाची आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. या बदलाचा थेट परिणाम आता १२ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांवर होणार आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत विविध ८ बदल करण्यात आले आहेत. काही दिवसाअगोदरच, लाभार्थ्यांना ई- केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता जो बदल करण्यात आला आहे.

यामुळे अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवणे सोपे होणार आहे. देशात गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने पीएम किसान योजना सुरू केली होती. मात्र, अनेकांनी या योजनेचा गैरफायदा घेत आर्थिक लाभ (Economic Benefits) मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. लाखो अपात्र शेतकऱ्यांनी २-२ हजार रुपयांचे अनेक हप्ते मिळवले आहेत. काही ठिकाणी प्राप्तीकर भरण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळवला आहे, तर काही ठिकाणी पती- पत्नी दोघेही सरकारी पैसे घेत आहेत. शेती पती- पत्नीच्या नावावर असली, ते एकत्र राहत असणार आहे, आणि कुटुंबातील मुले अल्पवयीन असतील तर या योजनेचा लाभ फक्त एका व्यक्तीलाच मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. असे असून देखील काही शेतकरी जोडप्यांनी खोटी कागदपत्रं जमा करून किसान योजनेतील पैसे मिळवले आहेत.

हे देखील पहा-

पुढील काही दिवसामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेतील ११वा हप्ता (Instalment) शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. त्याअगोदर मोदी सरकारने योजनेमध्ये मोठा बदल करत फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अपात्र शेतकऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने आता वसुलीच्या नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. कित्येक ठिकाणी तर फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर तुरुंगात जाण्याची देखील वेळ आली आहे. तुरुंगात जायचं नसेल तर चुकीच्या पद्धतीने घेतलेले पीएम किसान योजनेचे पैसे परत करण्याची सूचना सरकारने दिली आहे. यासाठी सरकारने पीएम किसान पोर्टलवर एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पैसे परत करू शकणार आहे.

PM Kisan Yojana
फार्मसी प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक; महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला अटक

1) किसान क्रेडिट कार्ड आणि मानधन योजनेचा लाभ

2) स्टेटस पाहण्याकरिता सोय

3) स्व-नोंदणी सुविधा

4) आधार कार्डची सक्ती बंधनकारक

5) शेती क्षेत्राची मर्यादा रद्द

6) ई-केवायसी बंधनकारक असणे

7) पीएम किसान योजनेमध्ये रजिस्ट्रेशन (PM Kisan yojana) केल्यावर शेतकरी आपले स्टेटस तपासू शकणार आहेत. पीएम किसान पोर्टलला (PM Kisan Portal) भेट देऊन, कोणताही शेतकरी आपला आधार क्रमांक (Aadhaar number), मोबाईल किंवा बँक खाते क्रमांक वापरून अॅप्लिकेशनची चालू स्थिती काय आहे. आपल्या बँक खात्यामध्ये किती हप्ता जमा झाला आहे, अशा गोष्टीं देखील माहित करू शकणार आहे. आता मात्र, या सुविधेमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत.

आता शेतकरी पीएम किसान पोर्टलवर मोबाईल क्रमांक वापरू शकणार नाही. येथून पुढे अॅप्लिकेशन स्टेटस (Application Status) जाणून घेण्याकरिता आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांकच वापरता येणार आहे. शेतकऱ्यांची वैयक्तीक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. देशातील फक्त गरजू शेतकऱ्यांपर्यंतच पीएम किसान योजना प्रभावीपणे पोहचावी म्हणून सरकार प्रयत्नशील राहणार आहे. यामुळे किसान योजनेमध्ये सातत्याने बदल केले जात आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com