Video : आता मी जगून तरी काय करु; शेतकरी महिलेनं फोडला हंबरडा...

डोळ्यासमोर पिकं वाहून गेल्याने मनाला चटका लावणारा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल
Video : आता मी जगून तरी काय करु; शेतकरी महिलेनं फोडला हंबरडा...
Video : आता मी जगून तरी काय करु; शेतकरी महिलेनं फोडला हंबरडा...संतोष जोशी

नांदेड : हाता तोंडाशी आलेलं पिकं डोळ्यासमोर वाहून गेल्याने शेतकरी महिलेनं आता जगून तरी काय करु, असे म्हणत अक्षरशः हंबरडा फोडला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पोखर्णी या ठिकाणी ही घटना मनाला चटका लावणारी आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हे देखील पहा-

व्हिडीओ मध्ये दिसणारी ही महिला पोखर्णी गावची राऊबाई चाटे आहे. राऊबाई, पती आणि विधवा सुनेसह ते राहत आहेत. चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे राऊ बाईचे साडेतीन एकर मध्ये असलेले सोयाबीन वाहून गेले आहे. स्वतःच्या लेकराप्रमाणे जपलेले हे पिकं क्षणार्धात वाहून गेल्याने राऊबाईचे अश्रु अनावर झाले आहेत. खरीप पिकांवर बळीराजांचे वर्षाचं आर्थिक गणित अवलंबून असतं.

Video : आता मी जगून तरी काय करु; शेतकरी महिलेनं फोडला हंबरडा...
Farmer Protest : टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात

मात्र, हजारो रुपये खर्च करुन देखील आता हाती काहीच लागणार नाही, म्हणून राऊबाईने हंबरडा फोडला आहे. जिल्हयात पावसाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवल्याने अनेक शेतकऱ्यांची अवस्था राऊबाई प्रमाणे झाली आहे. त्यामुळे पिकं विम्यावर भरवसा राहिला नसल्याने मायबाप सरकारच्या मदतीकडे बळी राजाचे डोळे लागले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com