वन्यप्राण्यांकडून कोवळ्या पिकांचे नुकसान,गावात वानरांची दहशत

शेती कशी करायची सांगा, शेतकऱ्यांचा सवाल
Parbhani News
Parbhani NewsSaam Tv

परभणी - खरीप हंगामातील पिकांना यावर्षी ऐनवेळी उपयुक्त असा पाऊस पडत असल्याने पिके ही चांगली बहरली आहेत. मात्र बहरलेल्या या कोवळ्या पिकावर वन्यप्राणी ताव मारून पिकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत. याबाबत अधिकाऱ्यांपासून ते लोकप्रतिधीनीपर्यंत सर्वांची दारे ठोठावून सुध्दा कुणीही शेतकऱ्यांकडे (Farmer) लक्ष देत नाही. त्यामुळे हताश झालेले शेतकरी आता मात्र 'सांगा, आम्ही शेती करायची का नाही ? असा सवाल करीत आहेत.तर जिल्हात काही भागात गावात वानरांची दहशत असून वनविभागा सातत्याने सांगून ही दुर्लक्ष होत आहे.

रोहि ,हरीण, माकड, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचे वास्तव्य राहते. हे वन्यप्राणी दिवसभर शेतशिवारात घुसून शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तूर, मुग, ऊडीद, कपाशी या पिकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत. रात्रीचा दिवस करून केलेली शेती अशी डोळ्यासमोर वाया जात असेल तर जगायचे कसे, आणि खायचे तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. एकीकडे कुटूंबाचे पालन आणि पोटाची खळगी भरण्याकरीता कष्ट करणे आणि दुसरीकडे वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करणे यामुळे शेतकरी चांगलाच हतबल झाला आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही वनविभागाची आहे परंतु याचे कोणतेही सोयरसुतक वनविभागाला नाही. ही खरी शोकांतिका आहे. मग वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह वनविभागाचे कर्मचारी वर्षभर करतात तरी काय ? असा प्रश्न जनमानसातून उपस्थित केला जात आहे.तर जिल्हात अनेक गावात माकडांचा मुक्तसंचार असून हया वानरांमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.शेतात सध्या सर्वच पिके चांगली बहरली आहेत परंतु वन्यप्राण्यांकडून भरदिवसा डोळ्यादेखत पीके उध्वस्त करण्याचा सपाटा सुरू आहे.

वन्यप्राण्यांने शेतातील पिकांचे नुकसान केल्याची ओरड घेऊन नुकसान शेतकरी वनविभागाच्या दारात पोहचल्यास मोका चौकशी, पंचनामा, अहवाल असा कागदीघोळ्यांचा खेळ सुरू होतो. तो मग वर्षे दोन वर्षे चालतो दीर्घ प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या पदरात नुकसान भरपाईची रक्कम पडते. मात्र ती केवळ दोन तीन हजाराची असते. भरपाई मिळविण्यासाठी वनविभागागाचे खेटे घालण्यासाठी शेतकऱ्यांना आलेला खर्च त्यापेक्षा अधिक असतो. त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान लाखोंची असतांना भरपाईची रक्कम मात्र खिरापती सारखी दिली जाते.

Parbhani News
धक्कादायक! चिखलाच्या रस्त्यानं घेतला ८ वर्षीय मुलाचा जीव

दुसरी कडे शेतात वन्यप्राण्यांचा धुडगूस सुरू आहे तर अनेक गावात माकडाची दहशत आहे सेलु तालुक्यातील कूपटा गावात गेल्या अनेक वर्षापासून माकडांच्या टोळीने गावातील ग्रामस्थांमध्ये दहशत आहे.दिवसा गावातूनलहानमुले,महिला,वृध्दाना घराबाहेर पडता नाही,तर वानरे घरातील खाण्यापिण्याच्या वस्तूंवर ताव मारतात,वानरांचा हैदोसाने घरे खिळखिळी झाली असून,वानरे मागे लागतं हातपाय मोडले आहेत ग्रामस्थांनी वनविभागाला अनेक वेळी सांगून वनविभागा कडून काहीही कारवाई होत नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com