नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे साडेतीन हजार हेक्टरचे नुकसान

रविवारी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे साडेतीन हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात काही दिवस मंदावलेला पाऊस रविवारी जोरदार झाला.
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे साडेतीन हजार हेक्टरचे नुकसान
नांदे़ड जिल्ह्यात खरिपाची नुकसान

कृष्णा जोमेगांवकर

नांदेड : रविवारी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे साडेतीन हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात काही दिवस मंदावलेला पाऊस रविवारी जोरदार झाला. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागात झाल्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना सुरुवात झाली. तसेच दुबार पेरणीचे संकट टळले. परंतु हा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे खरीप पिकांचेही नुकसान झाले आहे. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने जिल्ह्यातील सात तालुक्यासह ३१ मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली. सरासरी ५६ मिलिमीटर झालेल्या पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आला. यात पिके खरडून गेली तर काही ठिकाणी पाणी साचून पिकाचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीत जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ७७ शेतकर्‍यांचे तीन हजार ३३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. या सोबतच तिघेजण या आपत्तीत मृत्यू पावले आहेत. यात मुखेड तालुक्यातील कापरवाडी येथील साईनाथ प्रमोद लांडगे (वय आठ) या मुलाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. तर लोहगाव (ता. बिलोली) येथील सुशीला शिवराम चिंतले व पानशेवडी अंतर्गत गणातांडा (ता. कंधार) येथील दिनेश केशव पवार (वय २५) या दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. यात संदीप केशव पवार जखमी झाला आहे. जिल्ह्यात चार मोठी जनावरे दगावली. यात शिराढोण (ता. कंधार) येथील दत्ता गोदरे यांची म्हेस, लोहा येथील दोन जनावरे वीज पडून मृत्यू पावले. जांब बुद्रुक येथील राम पुंडे यांची एक म्हेस मृत्यू पावली. जिल्ह्यातील ४९ घरांची अंशतः पडझड झालेल्या ची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

हेही वाचा - हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार ता. 12 ते 16 जुलै या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगाच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

नुकसानीची दखल नाही

अद्यापही अनेक ठिकाणी अतिवृृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु नुकसानीबाबत पंचनामे झाले नाहीत. अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील ज्ञानेश्वर गोविंदराव इंगोले यांच्या हळद व सोयाबीन पिकाची अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत प्रशासनाने दखल घेतली

नसल्याचे त्यांनी सांगीतले. यामुळे नुकसान झालेल्या सर्वच भागाची पाहणी करुन भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com