शेतकऱ्यांना ३२४ कोटी पीककर्ज वितरित

शेतकऱ्यांना ३२४ कोटी पीककर्ज वितरित
शेतकऱ्यांना ३२४ कोटी पीककर्ज वितरित
Crop LoanSaam tv

धुळे : खरिपात शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खते वेळेत खरेदी करता यावेत यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वितरण सुरू आहे. आत्तापर्यंत ३० हजारावर शेतकऱ्यांना (Farmer) ३२४ कोटी ८३ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अभिजित देशपांडे यांनी दिली. (dhule news 324 crore crop loans distributed to farmers)

Crop Loan
हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक; हजरत अनगड शाह बाबा दर्गावर मानाची आरती

धुळे (Dhule) जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) व जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात १ एप्रिल २०२२ पासून पीक कर्ज वितरणास सुरुवात झाली. धुळे व नंदुरबार (Nandurbar) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, एमएससी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे (Crop Loan) वितरण करण्यात येते. खरीप पीक कर्ज वितरणासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी धुळे जिल्ह्यास ७१३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३० हजार ७१६ शेतकऱ्यांना ३२४ कोटी ८३ लाख चार हजार रुपये पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे.

पात्र शेतकऱ्यांनी घ्यावे कर्ज

पीक कर्ज वितरणाचा जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी वेळोवेळी आढावा घेतात. त्यानुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पीक कर्ज वितरणाचा आढावा घेतला असून प्रत्येक सभासद शेतकऱ्याला पीक कर्ज वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनीही पीक कर्ज घेऊन शेतीत प्रगती साधावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्यासह उपनिबंधक श्री. देशपांडे यांनी केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com