Abdul Sattar: अधिवेशन संपण्यापूर्वीच नुकसान भरपाई जाहीर होईल; कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी केले स्पष्ट

अधिवेशन संपण्यापूर्वीच नुकसान भरपाई जाहीर होईल; कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी केले स्पष्ट
Abdul Sattar
Abdul SattarSaam tv

धुळे : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सणाच्या दिवशी देखील मला शेतकऱ्यांसोबत बोलून हे सरकार त्यांच्या पाठीशी (Dhule News) आहे हे सांगण्यासाठी पाठवलं आहे; असे म्हणत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सणाच्या दिवशी देखील मी नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर शेतकऱ्यांशी (farmer) बोलण्यासाठी आलो असल्याचे स्पष्ट केले. नुकसान भरपाईवर बोलत असताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सहा महिन्यात चौथ्‍यांदा या सरकारला नुकसान भरपाई देण्याची वेळ आली असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. (Maharashtra News)

Abdul Sattar
Gold Price: सोने ६० हजारांवर, तरीही गुढीपाडवा मुहूर्त साधला

कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आज धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी धुळे तालुक्यातील आनंद खेडा या ठिकाणी अवकाळी व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या मका व कांदा पिकाच्या शेतात पाहणी केली आहे.

अधिवेशन संपण्याच्या आत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा करतील; असे म्हणत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक लाख ३९ हजार हेक्टरवर अवकाळी व गारपीटीचे नुकसान झाले असून गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप होता. आता तो मिटल्यानंतर सर्व कामांना सुरुवात झाली आहे. दोन दिवसाच्या आत सर्व शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सरकारकडे सादर होतील, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.

Abdul Sattar
Raju Shetty: मगच राज्‍याचा कारभार चालवावा; राजू शेट्टी यांचे मुख्‍यमंत्र्यांचा आवाहन

आनंदाचा सिधा मिळेलच

मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा सण चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा; यासाठी आनंदाचा शिधा देण्याचा जो निर्णय घेतला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी जरी आनंदाचा शिधा हा नागरिकांना मिळाला नसेल, तरी देखील तो यापुढेही रमजान असेल तसेच आंबेडकर जयंती असेल या सर्व सणांना हा आनंदाचा सीधा देणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com