Agriculture News: तुरीवर अळीचा प्रादुर्भाव; उत्पादक बळीराजासमोर चिंता

तुरीवर अळीचा प्रादुर्भाव; उत्पादक बळीराजासमोर चिंता
Dhule Farmer News
Dhule Farmer NewsSaam tv

धुळे : खरिपाच्या हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) खरिपाचा हंगाम शेतकऱ्यांचा (Farmer) पूर्णतः वाया गेला आहे. परंतु रब्बी हंगामात थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यामुळे तूर उत्पादकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवी झाल्या. परंतु शेतकऱ्यांच्या या आशांवर अळीच्या प्रादुर्भावामुळे पाणी फेरण्याची वेळ आली आहे. (Breaking Marathi News)

थंडीचा जोर वाढल्यानंतर तुरीच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फुलोरा आल्याचे बघायला आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून निघण्याची आशा वाटू लागली होती. त्यातच आता तुरीच्या शेंगांवर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला असल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याची भीती वाटू लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com