तिसगाव ढंडाने परिसरात वीज कोसळली; बैलाचा जागीच मृत्यू

तिसगाव ढंडाने परिसरात वीज कोसळली; बैलाचा जागीच मृत्यू
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये तालुक्यातील तिसगाव ढंडाणे या परिसरात लिंबाच्या झाडावर वीज कोसळल्‍याने झाडाखाली बांधलेला बैल जागीच ठार झाला. शेती मशागतीच्या काळामध्ये बैलाच्या अंगावर वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे संबंधित शेतकरी (Farmer) चांगलाच संकटात सापडला आहे. (dhule news caused power outage in the area The bull died on the spot)

Dhule News
खडसेंच्‍या विजयासाठी जळगावात महादेवाला दुग्‍धाभिषेक, पायी वारी

रविवारी सायंकाळी अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार (Rain) पाऊस झाला. यात संध्याकाळी कापडणे परिसरामध्ये झालेल्या पहिल्‍याच पावसात भात नदी यंदा पहिल्यांदाच वाहू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर पेरणी झालेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागून होत्या. त्यानंतर (Dhule News) आज झालेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट डोक्यावर घोंगावणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बैल दगावल्‍याने शेतकरी संकटात

वादळी वारा व विजांच्‍या कडकडासह पाऊस झाला. तिसगाव येथील शेतकरी गोपीचंद पाटील यांचे देवभाने शिवारात शेत असून शेतातील काम आटोपून पाटील यांनी कडूनिंबाच्या झाडाला बैलजोडी बांधून बाजूच्या शेतात बांधलेल्या घरात पावसामुळे आश्रयासाठी गेले. या दरम्‍यान निंबाच्‍या झाडावर वीज पडली. यात बैलाचा मृत्‍यू झाला. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com