अतिवृष्टीमुळे खराबी; कांद्यावर फिरविला ट्रॅक्टर

अतिवृष्टीमुळे खराबी; कांद्यावर फिरविला ट्रॅक्टर
अतिवृष्टीमुळे खराबी; कांद्यावर फिरविला ट्रॅक्टर

धुळे : मोठ्या कष्टाने घेतलेले कांद्याचे पीक अतिवृष्टीमुळे खराब झाले. काही केल्या उत्पन्न येणार मसल्याने शेतकऱ्याने पिकावर ट्रॅक्टर फिरविला. (dhule-news-continue-rain-droped-onion-crop-on-tractor-farmer-loss)

सततच्या पावसामुळे खराब झालेल्या कांदा पिकावर शेतकऱ्याने ट्रॅक्टर फिरवला आहे. लामकानीसह परिसरात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा पीक पूर्णतः खराब झाले असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यावर्षी जून व जुलैमध्ये पाऊसच नसल्याने सुरवातीला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. चाऱ्यासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. परंतु ऑगस्ट अखेर आणि सप्टेंबरच्या सुरवातीलाच सतत पडणारा पाऊस व दिवसा सकाळी वातावरणातील धुके अशा खराब हवामानाने शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पाउस नसतांना वाढविले पिक

पाऊसच नसल्याने सुरवातीला शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कशीबशी पिके जगवली. परंतु उशिरा झालेल्या पावसाने नुकसान करत शेतकऱ्याच्या तोंडातला घास हिरावून घेतला आहे.

शेतकऱ्याचा झाला नाइलाज

काही दिवसांपूर्वीच पावसा अभावी देखील शेतकऱ्यांनी जीवापाड जपत वाढविलेले पीक पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर खराब झाले आहे. लामकनी शिवारातील युनुस खाटीक या शेतकऱ्याने अखेर आपल्या खराब झालेल्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com