Dhule News: वाढत्या थंडीचा परिणाम; दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता झाली कमी

वाढत्या थंडीचा परिणाम; दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता झाली कमी
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. या थंडीचा परिणाम मानवी जीवनावर होत असतानाच दुभत्या जनावरांवर देखील याचा विपरीत परिणाम होत असून जनावरांच्या दूध (milk) देण्याच्या क्षमतेवरच याचा मोठा परिणाम होत असल्याचे उघडकीस आले आहे. दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता (Dhule News) वाढत्या थंडीमुळे कमी होऊ लागल्याने दुधाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. (Live Marathi News)

Dhule News
Jalna News: मॉर्निंग वॉक दरम्‍यान हृदयविकाराचा झटका; पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

धुळ्यात (Dhule) गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस देखील सरासरीपेक्षा दुपटीने झाला आहे. त्यामुळे परिणामी थंडीचा प्रमाणात वाढ देखील मोठ्या प्रमाणात होणार याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा थंडीचा जोर अधिक राहणार असल्‍यामुळे या थंडीचा परिणाम दुखत्या जनावरांवर होणार नाही याची काळजी देखील पशुपालकांनी घेणे गरजेचे आहे.

दुध देण्याची क्षमता निम्‍यावर

धुळ्यातील पशुंवर थंडीचा परिणाम होऊ लागल्यामुळे त्यांच्या दूध देण्याची क्षमता देखील कमी झाल्याचे उघडकीस आले आहे. ज्या ठिकाणी दहा ते बारा लिटर दूध देणारे जनावर आता चार ते पाच लिटर दूध देत असल्याने दुधाचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.

असा करा बचाव

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे दुभते जनावर पाळणाऱ्यांना थंडीपासून जनावरांचा बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पशुपालकांनी बंदिस्त गोठ्यामध्येच आपल्या जनावरांची सोय करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दुभत्या जनावरांच्या अंगावर गोणपाट टाकून जेणेकरून जनावरांचा थंडीपासून बचाव होऊन त्यांना उब मिळेल; अशी सोय करावी. त्याचबरोबर जनावरे बांधलेल्या गोठ्यामध्ये शेकोटी करून थंडीचा प्रादुर्भाव जनावरांना जाणवणार नाही याची काळजी घ्यावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com