Apple Bore: ॲपल बोर गेले वाया; हवामान बदलाचा फटका

ॲपल बोर गेले वाया; हवामान बदलाचा फटका
Apple Bore: ॲपल बोर गेले वाया; हवामान बदलाचा फटका
Apple Boresaam tv

धुळे : आठवडाभरापासुन ढगाळ वातावरण आहे. यात शिंदखेडा, शिरपूर परिसरात गारपीट झाली आहे. यामुळे नुकसान देखील झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे अनेक पिकांना फटका बसत असून लागवड केलेले ॲपल बोराला (Apple Bore) देखील किड लागल्‍याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. (dhule news farmer Apple bore loss The impact of climate change)

Apple Bore
Bribe: शेड बांधणीच्‍या कामासाठी लाच; कनिष्‍ठ लिपीक ताब्‍यात

धुळे (Dhule) जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण बघावयास मिळत आहे. ढगाळ वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना (Farmer) बसताना बघावयास मिळत आहे. धुळे तालुक्यातील निमडाळे येथील बोर उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात एप्पल बोरांची लागवड केली आहे. त्यावर हवामान बदलाचा (Climate) फटका जाणवत असून दरवर्षी या शेतकऱ्यास तीन ते चार लाख रुपये या ॲपल बोरच्या माध्यमातून मिळत असतात.

दहा हजाराचे देखील उत्‍पन्‍न नाही

यंदा ढगाळ वातावरणामुळे अँप्पल बोर या पिकाला मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे या बोरांना कीड लागल्यामुळे यंदा या शेतकऱ्यास दहा हजार रुपये देखील उत्पन्न मिळणार नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. कृषी विभागाने याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी या शेतकऱ्या तर्फे करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.