पावसाळा तोंडाशी तरी ऊस तोडणी नाही; शेतकरी चिंतेत

पावसाळा तोंडाशी तरी ऊस तोडणी नाही; शेतकरी चिंतेत
पावसाळा तोंडाशी तरी ऊस तोडणी नाही; शेतकरी चिंतेत
FarmerSaam tv

धुळे : ऊस लागवड करून जवळपास पंधरा महिने उलटले आहेत. ऊस तोडणीला आला असताना देखील कारखानदारांकडून अद्यापही ऊस तोडणीसाठी कुठल्याही प्रकारची हालचाल केली जात नाही. तसेच उष्णतेचा पारा देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे बहुतांश ठिकाणी ऊसाला (Sugarcane) आग लागल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यातच तोडणीला आलेला ऊस शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत जळून खाक होत असल्यामुळे उर्वरित ऊस उत्पादक शेतकरी (Farmer) देखील चांगलेच चिंतेत सापडले आहे. (dhule news Farmers worried There is no sugarcane harvest even in the rainy season)

गेल्या आठवड्यामध्ये बीड (Beed) येथील ऊस उत्पादक शेतकऱ्याने कंटाळून उसाच्या शेताला आग लावून स्वतः देखील शेतात असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्याचप्रमाणे आता इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी देखील हेच पाऊल उचलाव का? असा प्रश्न देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांतर्फे राज्य सरकारला विचारण्यात येत आहे. पावसाळा तोंडाशी आलेला असताना अद्यापही ऊसतोडणी संदर्भात कुठल्याही प्रकारची हालचाल ही राज्य सरकार त्याचबरोबर कारखानदारांकडून होत (Dhule News) नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला आहे. ऊस तोडणी संदर्भात राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन कारखानदारांना आदेश द्यावेत व तात्काळ ऊस तोडणी करण्यात यावी; अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.