शिंदखेडा येथील शेतकरी पाटील यांच्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद

दोंडाईचा येथील शेतकरी पाटील यांच्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद
Narendra Modi
Narendra ModiSaam tv

धुळे : डिजिटल इंडीया सप्ताहाचा गांधीनगर येथे शुभारंभ झाला. या कार्यक्रमातंर्गत शासकीय योजनांची अंमलबजावणी संदर्भात देशातील निवडक शेतकऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रत्यक्ष संवाद साधला असता यात शिंदखेडा येथील (Farmer) शेतकरी शालिकराव पाटील यांच्‍याशी संवाद साधला. (dhule news PM narendra Modi interaction with farmer from Shindkheda)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडीया सप्ताहअंतर्गत 4 जूलैला झालेल्‍या डिजिटल इंडीया सप्ताहाचा गांधीनगर येथे शुभारंभ केला. या कार्यक्रमात पंतप्रधान केंद्राकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी संदर्भात देशातील निवडक शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला. यात उत्तर महाराष्ट्रातून (Dhule) धुळे जिल्ह्यातील बाम्हणे (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी शालिकराव वामन पाटील यांची निवड झाली होती. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालिकराव पाटील यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालिकराव पाटील यांच्याकडून सामान्य सेवा केंद्रातून देश पातळीवर शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. याचा लाभ कशा पद्धतीने मिळाला याची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com