डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका; ट्रॅक्टर ऐवजी बैलजोडीने नांगरणी

रब्बी हंगाम संपल्या नंतर बळीराजा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.
डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका; ट्रॅक्टर ऐवजी बैलजोडीने नांगरणी
YavatmalSaam TV

संजय राठोड

यवतमाळ: रब्बी हंगाम संपल्या नंतर बळीराजा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे अशात डिझेलच्या भावात वाढ होत असल्याने यंदा प्रथमच बळीराजा टॅक्टर ऐवजी बैलजोडीने नांगरणीचे काम करत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शेतकरी बैलजोडीने नांगरणी करताना शेतात व्यस्त आहे, तर दुसरीकडे डिझेल भाववाढीचा फटका टॅक्टर चालकांना बसल्याने टॅक्टरची नांगरणी एकरी चौदाशे रूपये केल्याने शेतकऱ्यांना चौदाशे रूपये परवडत नसल्याने शेतकरी आपल्या सर्जाराजाने नांगरणी करित असल्याने टॅक्टर चालकांना टॅक्टर घरी उभे करण्याची वेळ आली आहे.

Yavatmal
पोलीस अधिकाऱ्याची एकाला मारहाण करत शिवीगाळ, Video Viral

मागच्या वर्षी डिझेल ८७ रूपये लिटर असल्याने नांगरणीचे एकरी भाव आठशे रूपये होते. मात्र या वर्षी डिझेलचे भाव १०४ रूपये ८६ पैसे एवढे झाल्याने टॅक्टर मालकांनी आठशे रूपये वरून थेट चौदाशे रूपये एकरी नांगरणीचे भाव वाढ केली, त्यामुळे शेतकऱ्यांना नांगरणीचे भाव परवडत नसल्याने पुन्हा मशागतीची कामे बैलजोडीने केल्या जात आहे.

कमीवेळात जास्त काम आणि झटकेफट काम व्हावं म्हणुन अनेक शेतकरी टॅक्टर ने खरीप ची नांगरणी करतात.मात्र चौदाशे रूपये देऊन टॅक्टर ने नांगरणी शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकरी बैलजोडीने आणि विशेष म्हणजे बलराम नागराने नांगरणी करित असल्याचे दिसत आहे. शेतीत मनुष्यबळ मिळत नसल्याने शेतीचे बहुतांश कामे ट्रॅक्टर च्या मदतीने केल्या जात होती.

मनुष्यबळ या व्यतिरिक्त वेळेचीही बचत शेतकऱ्यांना होत असे मात्र आता डिझेल चे भाव वाढल्याने बळीराजा पुन्हा बैलांच्या सहाय्याने मशागतीच्या कामाला लागला आहे. रखरखत्या उन्हात अंगाची लाही लाही होत असतानाच शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामास सुरवात केली आहे: सद्या नांगरणी व वखरणीचे कामे शेतकरी बैलाच्या जोडीनेच करत आहेत.ट्रॅक्टर परवडत नसल्याने अनेकांची ट्रॅक्टर उभे असल्याचे चित्र आहे.एकंदर इंधन दरवाढीचा फटका बळीराजासह टॅक्टर मालकांना बसला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.