कोरोनामुळे भाजीपाला पिकाला भाव नसल्याने, शेतकरी संकटात...

कोरोनामुळे भाजीपाला पिकाला भाव नसल्याने, शेतकरी संकटात...
farmer

भंडारा : कोरोना Corona संसर्गामुळे भंडारा Bhandara जिल्ह्यात भाजीपाला पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, शिवाय कोरोनामुळे लागलेल्या संचारबंदीमुळे Curfew भाजीपाला पिकाला तोडणीसाठी मजूर ही मिळत नाहीत. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेताच्या बांधावर सडत ठेवण्याची वेळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. मजूर मिळत नसून तसेच भाजीपाल्याला भाव नसल्याने भाजी विकुन भाज्यांचे पैसेही निघत नाही अशी स्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली असून भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. Due to corona vegetable crop is not priced farmers are in crisis

भंडारा जिल्हा तसा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे, मात्र अलीकडे पाण्याच्या उपलब्धतेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेण्यास सुरु केली आहे. आधुनिक तंत्रज्ञात व उपलब्ध बाजारपेठ Market यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मागील ६ ते ७ वर्षापासून भाजीपाला पिक घेऊ  लागला आहे. मात्र कोरोनाच्या संसर्ग वाढू लागल्याने लॉकडाउन लागले. एकीकडे लॉकडाउन Lockdown लागू होऊन संचारबंदी केल्याने भाजीपाला तोडण्यास मजूर मिळेनासे झाले आहे.  

तर दुरसीकडे उत्पादनकेलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने तोडणी खर्च परवडत नसल्याने भाजीपाला पिक शेताच्या बांधावर सडत ठेवण्याची वेळ जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. ठोक दरात वांगी ५ रु किलो, भेंडी १० रुपये किलो, कारले १२ रु किलो, टॉमटो ४ रु किलो, तर चवली १० रु किलो असे कमी  दरात विकली जात असल्याने १० किलो वांगी विकुन सुद्धा खान्या एवढे पैसे निघत नसल्याने जिल्ह्यातील भाजीपाला पीक घेणारा शेतकरी चिंतेत पडला आहे. Due to corona vegetable crop is not priced farmers are in crisis

त्यामुळे तोडणीची मजूरी, वाहतुकीचा खर्च व बाजारातील भाव यांचे गणित लागत नसल्याने शेतात भाजीपाला पिक सडू देण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांनाकडे नसल्याची परिस्थिति निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या फटका  राज्यात सर्वच क्षेत्राला बसला असल्याचे चित्र उभे असतांना आता त्याची झळ शेतकऱ्यांला बसत असल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे शेतकऱ्यांना देखील मदत मिळण्याची मागणी केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com