पावसाने दडी मारल्याने शेतकरी कावडीने पाणी आणुन जगवतोय भातपिक!

५ मुली व पत्नी असा मोठा परिवार हा पुर्णपणे शेतीवरच अंवलबून असल्याने ते शेतीत अपार कष्ट करीत आहेत.
पावसाने दडी मारल्याने शेतकरी कावडीने पाणी आणुन जगवतोय भातपिक!
पावसाने दडी मारल्याने शेतकरी कावडीने पाणी आणुन जगवतोय भातपिक!अजय दुधाणे

उल्हासनगर - भातपेरणी केल्यापासून एक महिना झाल्यानंतरही पाऊस न पडल्याने उगवलेली भाताची रोपे डोळ्यासमोर मरू लागल्याचे दृश्य बघून मुरबाड रोडवरील मानिवली गावच्या शेतकऱ्याने Farmer चक्क एक किलोमीटर अंतरावरुन कावडीने पाणी आणून ही भातरोपे जगवण्याचा प्रयत्न लक्ष्मण रामू गायकर हा शेतकरी करीत असून त्याचे हे अपार कष्ट बघूनतरी 'वरुणराजा' बळीराजावर प्रसन्न होणार का? असा प्रश्न पडला आहे.

मुरबाड-कल्याण रोडवर मानिवली हे छोटेसे गाव,शेतीप्रधान असल्याने येथील शेतक-यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे,पुर्णपणे ही शेती पावसावर अवलंबून असल्याने येथील शेतकरी लक्ष्मण रामू गायकर यांनी छोटी असलेल्या शेतीत ५ जुलै रोजी भातपेरणी केली होती. यावेळी चक्रीवादळामुळे पाऊस पडत असल्याने भाताच्या रोपांची उगवण चांगली झाली. त्यामुळे लक्ष्मण गायकर हे आनंदी झाले होते.

हे देखील पहा -

५ मुली व पत्नी असा मोठा परिवार हा पुर्णपणे शेतीवरच अंवलबून असल्याने ते शेतीत अपार कष्ट करीत आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे म्हणावीतशी भात लागवड करता आली नव्हती.पण यावेळी कोरोनाचे संकट थोडे कमी झाल्याने संपूर्ण कुंटूबांने शेतीत कष्ट करुन लागवड केली खरी पण गेल्या १५-२०दिवसापासून पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे मरु लागली होती,तर काही सुकत चालली होती. हे दृष्य बघून या शेतकऱ्याचे मन हेलाऊन गेले आणि एक कठोर निर्णय घेतला.

पावसाने दडी मारल्याने शेतकरी कावडीने पाणी आणुन जगवतोय भातपिक!
ईडीची सूडबुद्धीने कारवाई ; एकनाथ खडसे

शेतीपासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ओलावरुन 'कावडीने'पाणी आणून भाताला पाणी देण्याचा प्रयत्न सुरु केला. या शेतकऱ्याची शेती ही मानिवली रायता या रस्त्याच्या बाजूला असल्याने येणारे जाणारे लोक हे कष्ट बघून हळहळ व्यक्त करुन वरूणराजा आतातरी पड अशी विनंती करीत होते.

याबाबतीत लक्ष्मण गायकर या शेतकऱ्याला विचारले असता ते म्हणाले,पाच मुली धोडीशी शेती त्यातही असे संकट, आम्ही जगायचे कसे?पिक मरताना बघू शकत नाही,म्हणून मी कावडीने पाणी अणून पिक वाचवतोय,त्यामुळे शासनाने मदत करावी असे या शेतकऱ्याचे म्हणने आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com