Gudi Padwa 2023 : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीत हळद उठली, शेतकरी समाधानी; जाणून घ्या दर

आज पाडव्याच्या दिवशीही मार्केट कमिटी आवारात हळदीचे सौदे पार पडले.
gudi padwa 2023, sangli turmeric, sangli news
gudi padwa 2023, sangli turmeric, sangli newssaam tv

Sangli Turmeric News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती (sangli krushi utpanna bazar samiti) आवारात हळदीला प्रती क्विंटल 11 हजार 500 रुपये इतका दर मिळाला आहे. गुढी पाडव्याच्या (Gudi Padwa 2023) मुहूर्तावर सांगलीच्या (Sangli) मार्केट यार्डात हळद (turmeric) सौदे पार पडले. (Breaking Marathi News)

gudi padwa 2023, sangli turmeric, sangli news
Katraj New Tunnel : कात्रज नवीन बाेगदा वाहतुकीसाठी राहणार बंद, मुंबईला जाण्यासाठी जाणून घ्या पर्यायी मार्ग (पाहा व्हिडिओ)

दरवर्षी गुढी पाडव्याच्या (gudi padwa latest news) दिवशी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हळदीचे सौदे काढले जातात. यामध्ये खुल्या पद्धतीने हळदीचे लिलाव केले जातात. आज पाडव्याच्या दिवशीही मार्केट कमिटी आवारात हळदीचे सौदे पार पडले.

gudi padwa 2023, sangli turmeric, sangli news
Pandharpur :काळी हळद पैसे कमविण्याचा मार्ग ? अकलूजला ६५ लाखांची फसवणूक, पाेलिसांनी भिवंडीतील टाेळी पकडली (पाहा व्हिडीओ)

सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली (sp basavaraj teli) यांच्या हस्ते सौद्याचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये कर्नाटकातील हळदीला उच्चांकी 11 हजार 500 इतका दर प्रति क्विंटलसाठी मिळाला. याचबरोबर साडेसहा हजारापासून ते 11 हजार 500 पर्यंत हळदीला आजच्या सौद्यामध्ये दर मिळाला आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकरी समाधानी आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com