Wardha: जुगाडू इंजिनिअरचा त्याच्याच यंत्राने घेतला बळी!

वर्धा जिल्ह्यातील मांडवा गावात अभिजित वंजारी जुगाड करून शेतीत नवीन प्रयोग, नवीन यंत्र तयार करण्यासाठी या युवकाची सातत्यानं धडपड असायची.
Wardha: जुगाडू इंजिनिअरचा त्याच्याच यंत्राने घेतला बळी!
Wardha: जुगाडू इंजिनिअरचा त्याच्याच यंत्राने घेतला बळी!सुरेंद्र रामटेके

सुरेंद्र रामटेके

वर्धा : वर्धा Wardha जिल्ह्यातील मांडवा गावात अभिजित वंजारी जुगाड करून शेतीत Farming नवीन प्रयोग, नवीन यंत्र तयार करण्यासाठी या युवकाची सातत्यानं धडपड असायची. या तरुणाने बॅटरीवर चालणारे असं यंत्र तयार केलं होतं ज्याने कमी वेळात कमी किमतीत तुरीवरील शेंडी कापने शक्य होतं पण या यंत्राने त्यांचा जीव गेला.

हे देखील पहा-

अवघ्या वीस वर्ष असलेला विद्यार्थी अभिजित पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणीवर मात करण्याचा तो प्रयत्न ही करत होता. स्कूटरच्या इंजिन पासून बनविलेले मिनी ट्रॅक्टर, कुलरच्या मदतीन बनवलेले स्प्रिंकलर असे अनोखे प्रयोग त्यांनी केले होते.

असाच आणखी प्रयोग होता बॅटरीवर चालणारा ते कट्टर, तुरीचे शेंडे कापत असताना अचानक त्या यंत्राच ब्लेड तुटल आणि अभिजीतच्या शरीराच्या भागात खुपसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूच्या अगोदरच्या रात्री त्या तरुणाने पावर प्लांट इंजिनिअरिंगकरिता अर्जही भरला होता. त्याला इंजिनिअर बनायचं होतं. पण काळान त्यापूर्वीच इंजिनिअर हिरावून घेतला.

Wardha: जुगाडू इंजिनिअरचा त्याच्याच यंत्राने घेतला बळी!
Payal Rohatgi: अभिनेत्री पायल रोहतगी विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल!

शिक्षणाव्यतिरिक्त तो आपल्या वडिलांना शेती मध्ये करायचा मदत;

त्याचे वडील प्रशांतराव वंजारी यांनी सांगितले की, आम्ही तिघेही बाप-लेक शेतात गेलो होतो सकाळी आठ वाजता तो म्हणाला मी तुरी छाटतो तुम्ही शेंगा तोडा आणि एक मुलगा कोठ्यात होता मी शेंगा तोडता तोडता पाहत होतो त्याला तो दिसला नाही म्हणून त्याला पाहण्यासाठी तिकडे गेलो असता तो मृतावस्थेत खाली पडून होता त्याने तयार केलेल्या यंत्राच्या चक्रीच पात्या त्याच्या पोटात घुसले होते. असे त्यांनी सांगितले.

शेतातील साहित्य आणण्यासाठी दुचाकीवर ट्राली तयार केली होती. अभिजीत कोणत्याही कामासाठी पुढाकार घ्यायचा ते शेतातली काम असो की जुगाडू तंत्रज्ञान विकसित करणे असो, त्याच्या मित्रांनी सांगितले, शिक्षणाव्यतिरिक्त तो आपल्या वडिलांना शेती मध्ये मदत करायचा. यातून वाचलेला वेळ आहे तो नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात घालवायचा आणि अन्य वेळी इतरांनाही मदत करायचा. आता त्याने बनविले हे यंत्र शेतकऱ्यांना सोयीचं व्हावं कमी वेळात जास्त काम व्हावं यासाठी हे यंत्र त्याने बनविले होतं पण त्याच्या या यंत्रानेच  त्याचा जीव जाईल. असं त्याला वाटलं नव्हतं आम्ही त्याच्याकड भविष्यातला उद्योजक म्हणूनही बघित होतं. पण त्याच सगळं स्वप्न स्वप्नच राहिलंय.

Wardha: जुगाडू इंजिनिअरचा त्याच्याच यंत्राने घेतला बळी!
WhatsApp ची मोठी कारवाई! दीड महिन्यात 30 लाख अकाऊंटवर बंदी

घटनेच्या आदल्या दिवशी रात्री अभिजीतने ते कटर यंत्र तयार केलं होतं मात्र हाच त्याचा अखेरचा प्रयोग ठरला त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे काही दिवसांपूर्वीच यवतमाळ जिल्ह्यातील प्रयोगशील युवकाचा हेलिकॉप्टरच पात तुटून मृत्यू झाला होता.. असे अनेक घटनात युवकांचे मृत्यू झाले आहेत तंत्रज्ञान योग्य मिळावा यासाठी शासनाकडून काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com