पंकजा मुंडेंच्या 'वैजनाथ' चे बँक खाते सील

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे
पंकजा मुंडेंच्या 'वैजनाथ' चे बँक खाते सील
मंत्री पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे- Saam Tv

बीड : भाजप BJP नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे Pankaja Munde चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे Sugar Factory बँक खाते सील करण्यात आले आहे. कारखान्यातील कामगारांच्या पीएफ Provident Fund थकबाकीचे ९२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. EPFO Department sealed Bank account of Pankaja Munde Sugar Facorty

ही कारवाई ईपीएफओ औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय यांनी केली. भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारां विरुद्धची या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचारी कामगारांचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम, कारखान्याने त्यांच्या खात्यात जमा केली नव्हती.

हे देखिल पहा

पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याना स्थापनेची मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ काळासाठीची, भविष्य निर्वाह निधीची एक कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी कारखान्याच्या नावावर होती. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी ही कारवाई केली.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com