धक्कादायक! स्वतःची व्हिडिओ क्लिप बनवत शेतकऱ्याची आत्महत्या; पाहा Video
धक्कादायक! स्वतःची व्हिडिओ क्लिप बनवत शेतकऱ्याची आत्महत्या; पाहा VideoSaam TV

धक्कादायक! स्वतःची व्हिडिओ क्लिप बनवत शेतकऱ्याची आत्महत्या; पाहा Video

त्याच्या मागे पत्नी दोन मुली (एक ४ वर्षाची, एक २ वर्षाची) तसेच आजारी आई वडील आहेत.

अकोला : अकोल्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याने स्वतःची व्हिडिओ क्लिप बनवत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये मी आत्महत्या करी आहे अस म्हटले आहे. प्रवीण बाबुलाल पोळकट साखरी वय ३२ वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जाला कंटाळून ही आत्महत्या केल्याची माहिती आहे. अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील साखरी येथील युवा शेतकरी प्रवीण बाबूलाल पोळकट याने आपल्या शेतात विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर को. ऑप बँक तसेच महिंद्रा कोटकचे कर्ज असल्यामुळे तसेच या शेतकऱ्याचा छोटा ट्रॅक्टर काल फायनान्स वाल्यांनी नेल्यामुळे त्याच्या वर परिणाम झाला. त्यामुळे ही आत्महत्या केल्याची माहिती आहे. या शेतकऱ्याकडे स्वतःची तीन एकर कोरडवाहू शेती आहे. तसेच त्याच्या वडिलांना तोंडाचा कॅन्सर आहे. त्याच्या मागे पत्नी दोन मुली (एक ४ वर्षाची, एक २ वर्षाची) तसेच आजारी आई वडील आहेत.

दरम्यान राज्यात मराठवाडा, विर्दभ, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला त्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेले पिक एका क्षणात नाहिसे झाल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला, परिणामी काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. काही ठिकाणी तर शेतकरी जोडप्यानं आत्महत्या केल्याचं समोर आले. सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मदत जाहिर करण्यात आली खरी पण काहींना ती मिळाली तर काही शेतकरी अजून मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. राज्यात सध्या अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकरी हवालदिल झालेला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.