Cotton Price : 'कापसाचे भाव कापले, कोणीच नाही आपले'; भूमिपुत्र एल्गार संघर्ष समिती आक्रमक

खुल्या बाजारामध्ये सरकीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याने कापसाचे दर आणखीन गडगडले आहेत.
Cotton Price, Aandolan
Cotton Price, AandolanSaam tv

- संजय राठोड

Cotton Price : शेतकऱ्यांच्या (farmers) शेतमालाला आम्ही तर निश्चित करून तसेच कापसासह (cotton) सोयाबीन (soyabean), तूर (tur) पिकांना भाव मिळावा या मागणीसाठी भूमिपुत्र एल्गार संघर्ष समितीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न भूमिपुत्र एल्गार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलं. शेतमालाचा सरकारी हमीदर निश्चित करताना अनेक प्रकारचे शेतीखर्च गृहीत धरले जात नाही.

Cotton Price, Aandolan
Maharashtra Congress : महाराष्ट्र काॅंग्रेस चिंतेत... बाळासाहेब थाेरातांच्या राजीनाम्यानंतर अशाेक चव्हाण म्हणतात आम्ही...

त्यामुळे हे हमीदर बाजाराचे तुलनेत नेहमीच अत्यल्प असतात. ज्यामुळे शेतकऱ्यांचे कायम नुकसान होत असते. सरकारने हे हमीदर निश्चित करण्याकरिता कृषी हमीभाव दर निर्धारण समितीचे पुनर्गठन करून सर्व बारीक सारीक शेती खर्च गृहीत धरूनच हमीभाव जाहीर करावेे अशी आग्रही मागणी भूमिपुत्र एल्गार संघर्ष समितीच्या ठिय्या आंदोलनात करण्यात आली.

सध्याची शेतमालाची परिस्थिती बघता कापसाला गेल्या वर्षाच्या तुलनेत फारच कमी भाव आहे. हीच परिस्थिती सोयाबीन आणि इतर शेतमालाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एक दिवसीय ठिय्या आंदोलन करून आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडल्या.

यावर्षी सुरूवातीपासून कापसाच्या भागामध्ये अनिश्चितता दिसून येत आहेत. सुरूवातीला कापसचे दर साडे आठ ते नऊ हजार रूपये होता. पण गेल्या काही दिवसांपासून कापसाचे भाव हे आठ हजार रुपयांभोवती फिरत हाेते. सध्या बाजारात कापसाचे दर साडे सात हजार रूपये आहेत.

Cotton Price, Aandolan
Ravikant Tupkar : पुन्हा एकदा आर-पारची लढाई; रविकांत तुपकर का झालेत आक्रमक ?

हंगाम सुरू झाल्यावर कापसाच्या भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये आशादायी चित्र होते. पण जसा जसा हंगाम समोर गेला तसे तसे आशादायक चित्र धुसर होऊ लागले आणि आता तर कापसाचे भाव हे आठ हजार रुपयांच्याही खाली आले आहेत. कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकरी मात्र आपला कापूस घरातच ठेवत आहे. गेल्यावर्षी कापूस तेरा हजार रुपयांच्या पुढे गेला होता. त्यामुळे शेतकऱ्याला यावर्षी किमान दहा हजार रुपये भावाची अपेक्षा होती पण ती अपेक्षा यावर्षी पूर्ण होताना दिसत नाही. (Maharashtra News)

सरकीचे भाव घसरल्याने कापसाच्या दरात मोठी घसरण

खुल्या बाजारामध्ये सरकीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याने कापसाचे दर आणखीन गडगडले आहेत. काही दिवसांपूर्वी आठ हजार रुपये क्विंटलवर असलेला कापूस आता सात हजार सहाशे क्विंटलपर्यंत खाली आला आहे. तेरा फेब्रुवारीपासून वायदे बाजार सुरू होणार आहेत. मात्र तत्पूर्वीच कापसाच्या किमती ठरविणारे घटकाचे दर खाली घसरत असल्याने कापसाच्या किमती कमी होत आहेत.

Cotton Price, Aandolan
Cotton Price Per Quintal : कापसाचा दर वाढला, उत्पादकांत चैतन्य; जाणून घ्या प्रतिक्विंटलला मिळणारा भाव

साडेचार हजार रुपये क्विंटल दर असलेली सरकी तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत खाली आली होती. आता सरकीचा दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत खाली आला आहेत. या सोबतच सरकीचा डेपचे दर घसरले आहे याचा थेट परिणाम कापसाच्या किमतीवर झाला आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com