अंबा सहकारी साखर कारखाण्याविरोधात शेतकरी आक्रमक...

सभासद शेतकऱ्यांच्या परस्पर विक्री केलेल्या 25 एक्कर जमिनीवर शेतकरी, कामगारांनी घेतला ताबा
अंबा सहकारी साखर कारखाण्याविरोधात शेतकरी आक्रमक...
अंबा सहकारी साखर कारखाण्याविरोधात शेतकरी आक्रमक...विनोद जिरे

बीड - भाजप BJP नेत्याच्या ताब्यात असणाऱ्या, बीडच्या Beedअंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखान्या Amba co-operative sugar factory विरोधात, आता शेतकऱ्यांसह Farmer कामगार आक्रमक झाले आहेत. कारखान्याची 25 एकर जमीन विक्री केल्याप्रकरणी, ऊस उत्पादक शेतकाऱ्यांसह कामगारांची कारखान्यावर संयुक्त बैठक संपन्न झाली आहे. शेतकऱ्यांना थकीत एफआरपी FRP देण्यासाठी, विद्यमान संचालक मंडळाने साखर आयुक्त पुणे यांच्या परवानगीने, अंबाजोगाई सहकारी कारखान्याच्या मालकीची 25 एकर जमीन विकल्याने हे सभासद शेतकरी ,कामगार आक्रमक झालेत.

हे देखील पहा -

शेतकरी नेते कालिदास आपेट , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली असून ठराव पारित करण्यात आले आहेत. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत असलेले कोट्यावधी रु.तात्काळ अंबासाखर ने द्यावेत. कारखान्यात काम केलेल्या सर्व कामगारांचे निवृत्ती वेतन, ग्रॅज्युएटी, आदी प्रकारचे देणी अंदाजे किमान 30 कोटी रुपयांच्या पुढे थकीत आहेत ते तात्काळ द्यावेत. चालू ऊस गळीत हंगाम वेळेत सुरू करावा.

अंबा सहकारी साखर कारखाण्याविरोधात शेतकरी आक्रमक...
'संजय राऊत कोथळा काढण्याची भाषा करतात, त्यासाठी हिंमत लागते'

चालू ऊस गळीत हंगामात कोणताही तांत्रिक अडथळा न येऊ देता कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांचा ऊस गाळप करावा. यासह अनेक ठराव यावेळी करण्यात आले. दरम्यान जोपर्यंत ऊस उत्पादक शेतकरी, साखर कामगार यांचे थकीत असलेले कोट्यवधी रु. मिळत नाहीत, तोपर्यंत 25 एकर विक्री केलेल्या जमिनीवर संबधित खरेदीदार बिल्डरांना ताबा करू दिला जाणार नाही. असा ठराव घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी इशारा दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com