पिकविम्यासाठी शेतकरी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी

येणाऱ्या 7 दिवसात पिक विमा नाही मिळाला तर प्रत्येक गावात करणार आंदोलन
पिकविम्यासाठी शेतकरी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी
पिकविम्यासाठी शेतकरी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजीविनोद जिरे

बीड : गेल्या २ वर्षात झालेल्या अतिवृष्टीने (Heavy rain), बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे (farmers) पिकांचे होत्याचे नव्हते झाले होते. तर यंदा संपूर्ण पीक (Crop) खरडून वाहून गेले आहे. मात्र, अद्याप अनेक शेतकऱ्यांना पीकविमा न मिळाल्याने, बीडमध्ये शेकडो शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Office) प्रचंड घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी पीकविमा मिळवा ही मागणी घेऊन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

हे देखील पहा-

दरम्यान प्रशासन (Administration) आणि लोकप्रतिनिधी केवळ घोषणाबाजी करत आहे. आजपर्यंत आम्हाला पीकविमा मिळाला नाही. आजही जिल्ह्यातील ४ लाख शेतकऱ्यांना मागील वर्षाचा पीकविमा मिळाला नाही. तर यंदा देखील ३० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीकविमा (Crop insurance) मिळाला नाही. त्यामुळे येणाऱ्या ७ दिवसात पीकविमा द्यावा. अन्यथा जिल्ह्यातील (district) प्रत्येक गावात आंदोलन केले जाईल, असा इशारा वजा अल्टिमेटम शेतकऱ्यांनी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com