अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकरी आक्रमक...

शेतकऱ्यांनी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग रोखला; अर्धातास रस्ता रोको वाहनाच्या रांगाच रांगा
अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकरी आक्रमक...
अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकरी आक्रमक...विनोद जिरे

बीड - अतिवृष्टीच्या अनुदानासाठी बीड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला होता. अतिवृष्टी होऊन देखील बीड तालुक्यातील मांजरसुंबा महसूल मंडळातील 30 गावं अनुदानापासून वंचित ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे या गावांचा अनुदानाच्या यादीत समावेश करा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

दरम्यान या रास्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांसह भाजप कार्यकर्ते सामील झाले होते. जवळपास अर्धा तास या महामार्गावरील वाहतुक रोखल्याने औरंगाबाद आणि अंबाजोगाईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. महसूल मंडळाच्या लेखी आश्वासनानंतर तूर्तास हे आंदोलन थांबवण्यात आले असले तरी मागणी मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com