शेतकऱ्यांवर आता सायबर भामट्यांची नजर 

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केलंय.
शेतकऱ्यांवर आता सायबर भामट्यांची नजर 
शेतकऱ्यांवर आता सायबर भामट्यांची नजर Saam Tv

औरंगाबाद  - अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता सायबर भामट्यांची नजर आहे. गेल्या पंधरवड्यापासून राज्य सरकारकडून दिली जाणारी आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. त्याशिवाय विमा कंपनीकडून पिक विम्याच्या परताव्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल. त्या रकमेवर डोळा ठेवून शेतकऱ्यांचे बँक खाते रिकामे करण्यासाठी सायबर गुन्हेगार सक्रिय होतील, अशी भीती आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे अशा सायबर गुन्हेगारांवर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची नजर असणारच आहे, तसंच पोलिसांनीही शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना बँकेतील व्यवहाराची प्रक्रिया फारशी माहिती नसते. त्याचाच फायदा सायबर भामटे घेण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांना फोन करायचा आणि त्यांच्या अकाउंटची माहिती घ्यायची किंवा मोबाईलवर ओटीपी पाठवून तो ओटीपी मागून घ्यायचा आणि पैसे लंपास करतील याची भीती सध्या वाटू लागली आहे.

शेतकऱ्यांवर आता सायबर भामट्यांची नजर 
संतापजनक! दुसऱ्या जातीतल्या मुलाबरोबर लग्न; पित्याने मुलीवरचं केला बलात्कार

आधीच मराठवाड्यातला शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात सायबर गुन्हेगार आता सक्रिय होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून सगळ्यांनीच सतर्क राहिलं पाहिजे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com