शेतकऱ्यांना कांद्याने रडवलं! ५० पैसे इतका कवडीमोल भाव

अवकाळीचा तडाखा, हवामानत बदल यामुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागल्यानं उत्पादन खर्च वाढला आहे.
Onion
OnionSaam Tv

नाशिक - बाजारसमित्यांमध्ये गोल्टी कांद्याला प्रति किलो ५० पैसे इतका कवडीमोल दर मिळाल्याने शेतकरी (Farmer) हवालदिल झालेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव सातत्याने घसरत आहे. आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या लासलगावमध्ये कांद्याला (Onion) किलोला अवघा ४ ते ९ रुपये, तर येवला आणि अन्य ठिकाणी अवघे १ रुपये किलो दर मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

कांद्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा वांधा केला आहे. कारण लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील अन्य बाजारपेठांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत कांद्याच्या दर सातत्याने घसरत आहे. विंचूर बाजारसमितीत तर गोल्टी कांद्याला प्रति किलो अवघा ५० पैसे इतका कवडीमोल भाव मिळाला आहे.

हे देखील पाहा -

शेतकरी सुनील दुगड यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या २० क्विंटल गोल्टी कांद्याला प्रति क्विंटल ५१ रुपये इतका दर मिळाला. त्यामुळे या नाराज शेतकऱ्याने विक्री न करताच कांदा परत घरी नेला. तर लासलगाव बाजारसमितीत कांद्याला अवघे ४ ते ९ रुपये प्रतीकिलो तर येवल्यासह अन्य काही ठिकाणी अवघे १ रुपये किलो इतका दर मिळत आहे. या दरात उत्पादन खर्च तर सोडाच वाहतूक खर्चही वसूल होत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. अवकाळीचा तडाखा, त्यात सध्या वाढतं तापमान, विजेचं भारनियमन, पाणीटंचाई यामुळे कांदा पीक आधीच अडचणीत आलेले असताना बाजारात कांद्याचे दरही घसरल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

Onion
रूढी परंपरांना फाटा देत वऱ्हाडी मंडळींना अनोखी भेट

कांद्याला मिळणारा बेभरवशाचा बाजारभाव, बदलत्या हवामानाचा फटका यामुळे गेल्या काही वर्षांपासून कांदा शेती आत बट्ट्याची बनत चालली आहे. त्यामुळे कांद्याला हमीभाव द्यावा, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या प्रश्नावरून दरवर्षी शेतकरी आंदोलनं तसच मोठा गदारोळ देखील होतो. यंदाही शेतकऱ्यांनी कांद्याला प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान आणि किमान आधारभूत किंमतीची मागणी केलीय. त्यामुळे कांद्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकार पातळीवरूनही प्रयत्न होणे गरजेच आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com